Goa Kala Academy: Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: 'कला अकादमी' सुसज्ज करण्याचे काम IIT Mumbai कडे; सल्लागार म्‍हणून नेमणूक, लवकरच अहवाल करणार सादर

Kala Academy News: नूतनीकरण केलेल्‍या कला अकादमीच्‍या नाट्यगृहातील कामांसह कोसळलेले खुले सभागृह पुन्‍हा उभारण्‍यासाठी आयआयटी मुंबईची सल्लागार म्‍हणून नेमणूक करण्‍यात आली आहे.

Sameer Panditrao

पणजी: नूतनीकरण केलेल्‍या कला अकादमीच्‍या नाट्यगृहातील कामांसह कोसळलेले खुले सभागृह पुन्‍हा उभारण्‍यासाठी आयआयटी मुंबईची सल्लागार म्‍हणून नेमणूक करण्‍यात आली आहे. पुढील काही दिवसांत मुंबई आयआयटी या कामांची पाहणी करून आपला अहवाल सादर करेल.

त्‍यानंतर नाट्यगृहातील दुरुस्‍त्‍यांसह खुले सभागृह नव्‍याने उभारण्‍याची प्रक्रिया सुरू करण्‍यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे मुख्‍य अभियंते सुभाष बेळगावकर यांनी शनिवारी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.

कला अकादमीच्‍या नूतनीकरणानंतरही कंत्राटदार टेकटॉन कंपनीने नाट्यगृहाच्‍या कामात त्रुटी ठेवल्‍या. त्‍याचा मोठा फटका काही नाटकांना सहन करावा लागल्‍याचे समोर आल्‍यानंतर या कामांतील त्रुटी शोधण्‍यासाठी राज्‍य सरकारने कृ​तिदलाची स्‍थापना केली.

कृतिदलाच्‍या सदस्‍यांनी कामांचा आढावा घेऊन नाट्यगृहातील ध्वनी, प्रकाश योजना आणि रंगमंचासंदर्भात तीन सल्लागारांची नेमणूक करण्याच्या सूचना ‘पीडब्ल्यूडी’ला केल्या होत्या. त्यानुसार ‘पीडब्ल्यूडी’ने ध्वनीसाठी रॉजर ड्रेगो, प्रकाश योजनेसाठी शीतल तळपदे आणि रंगमंचासाठी राजन भिसे यांची नेमणूक केली होती.

या तीन सल्लागारांनी नाट्यगृहाची पाहणी करून काही महिन्‍यांपूर्वी शिफारशींचा अहवाल सरकारला सादर केलेला आहे. त्‍यानंतर आता सरकारने नाट्यगृहातील त्रुटी दूर करण्‍यासह कोसळलेले खुले सभागृह पुन्‍हा उभे करण्‍याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी आयआयटी मुंबईची निवड करण्‍यात आली आहे, असे बेळगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: जो खिलाफ है मेरे मैं उनके विरुद्ध तो नही, पर हाँ... प्रदर्शन करणाऱ्या महिलेसमोर उभा ठाकला तिचाच पोलिस पती; पाहा सुंदर व्हिडिओ

North Goa: सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांची खैर नाही! 66 जण ताब्यात; उत्तर गोव्यात पोलिसांची मोठी कारवाई

Viral Video: प्रवाशांच्या जीवाशी खेळ! एसी डब्यात सिगारेट ओढणाऱ्या तरुणीचा हंगामा; प्रवाशांनी विरोध करताच सुरु झाली बाचाबाची

Duleep Trophy 2025 Final: 11 वर्षांनंतर सेंट्रल झोनच्या झोळीत दुलीप ट्रॉफी, अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा 6 विकेट्सने पराभव

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT