Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Kala Academy:... अन्यथा राजीनामा द्या! कला अकादमीवरुन कलाकार संतप्त, गोविंद गावडेंना 15 दिवसांचा अल्टिमेटम

Kala Academy: कला अकदामी नूतनीकरणाच्या कामापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, कलाकारांनी याबाबत आता आवाज उठवत गावडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

Pramod Yadav

Kala Academy

पणजीतील कला अकादमीचे नूतनीकरण करण्यासाठी राज्य सरकराने निविदा प्रक्रिया न राबवता सुमारे 50 कोटी रुपये खर्च केले. पण, कला अकादमीच्या समस्या अद्याप तशाच असल्याने संतप्त कलाकारांनी एकत्र येत मंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

कला अकादमीच्या समस्या आणि दुरुस्तीच्या मुद्यावरुन राज्यातील कलाकार गुज कार्यालयात एकत्र आले होते. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या महाचर्चेत कला अकादमी पूर्ववत करण्यासाठी कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला.

पंधरा दिवसात कला अकादमी पूर्ववत न झाल्यास गावडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त कलाकारांनी केली. विशेष म्हणजे या बैठकीला स्वत: गावडे देखील उपस्थित होते. मात्र, यावेळी काहीही न बोलता गावडेंनी शांत राहणे पंसद केले व बैठक संपताच तिथून काढता पाय काढला.

कलाकारांनी बैठकीत कला अकादमीच्या कामाची श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली.

दरम्यान, कला अकादमी नूतनीकरणाचे काम सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नूतनीकरणासाठी निविदा प्रक्रिया न राबविल्याने याकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. त्यानंतर गेल्यावर्षी अकादमीच्या खुल्या रंगमंचाचा छत कोसळल्याने विरोधकांनी याबाबत रान उठवले होते.

काम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा अकादमी खुली करण्यात आली तेव्हा प्रेक्षागृहात गळती होत असल्याचे समोर आले. तसेच, सभागृहातील सिलिंगचा काही भाग कोसळला होता. यानंतर तियात्र कलाकार राजदीप नाईक यांनी याबाबत आवाज उठवत कला अकादमीच्या ढीसाळ कामाचा पाढाच वाचला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Retirement: ''मनात संन्यास घेण्याचा विचार..." केएल राहुल क्रिकेटला ठोकणार 'रामराम'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

Goa to Nepal on Electric Bike: गोव्याच्या पोरांची कमाल! 'इलेक्ट्रिक बाईक'वरून गाठलं थेट 'नेपाळ'; 3,300 किमीचा थरार

UGC New Rules: "जातीवरुन कोणाशीही भेदभाव होणार नाही!", युजीसीच्या नवीन 'समानता' नियमावलीवर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं VIDEO

Goa Drug Case: 'वार्का'त फ्लॅटवर छापेमारी! 2 लाखांच्या ड्रग्जसह दोघे ताब्यात; गोवा पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉन 16000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ! पुन्हा एकदा 'ले-ऑफ'चा धडाका; बंगळुरु, हैदराबाद अन् चेन्नईतील ऑफिसेस 'हिटलिस्ट'वर

SCROLL FOR NEXT