Shripad Naik: MP श्रीपाद नाईकांना CM व्हायचंय? पत्रकाराच्या प्रश्नावर म्हणाले नशिबात असेल तर...

Shripad Naik: मनोहर पर्रीकर यांच्या अकाली निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे राज्याचे नेतृत्व देण्यात आले. सावंत गेल्या पाच वर्षापासून यशस्वीपणे पद सांभाळत आहेत.
Shripad Naik
Shripad NaikDainik Gomantak
Published on
Updated on

Shripad Naik

भाजपच्या श्रीपाद नाईक यांनी सलग सहाव्यांदा लोकसभेत जात विजयाची दुहेरी हॅट्रीक साधली. एवढेच नव्हे तर सलग दुसऱ्यांदा त्यांच्या गळ्यात राज्यमंत्रीपदाची माळ पडली आहे.

पण, झालेली लोकसभा निवडणूक माझी शेवटची निवडणूक असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी स्थानिक राजकाराणाबाबत मोठे सूतोवाच केले आहे.

स्थानिक राजकारणात उतरण्यास सांगितले तर मी निश्चित विचार करीन', असे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे.

गोवा मराठी पत्रकार संघातर्फे आज गोवा श्रमिक पत्रकार संघटनेच्या (गुज) सभागृहात 'गुज'च्या सहयोगाने श्रीपाद नाईक यांच्याशी वार्तालाप कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी व्यासपीठावर गोवा मराठी पत्रकार संघाच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष जयंत संभाजी, उपाध्यक्ष वामन प्रभू, गुरुदास सावळ, सचिव सुभाष नाईक व 'गुज'चे अध्यक्ष राजतिलक नाईक उपस्थित होते.

आपल्याला मुख्यमंत्री व्हावे असे वाटत नाही का, अशा एका प्रश्नावर 'नशिबात असेल तर मिळेल', असे श्रीपाद उत्तरले. शेवटी सामाजिक घटकांसाठी काम करणे महत्त्वाचे, असेही ते म्हणाले. श्रीपाद नाईक यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

Shripad Naik
ज्या वयात तुमची आमची मुलं गेम खेळण्यात वेळ घालवतात त्या वयात कुमारन बंधूंनी उभी केली करोडोंची गेमिंग कंपनी

श्रीपाद नाईक यांनी उत्तरेत काँग्रेसच्या रमाकांत खलप यांना एक लाखाहून अधिक मताधिक्य घेऊन पराभूत केले. सहाव्यांदा संसदेत गेलेल्या नाईकांना दुसऱ्यांदा राज्यमंत्रीपदाची संधी देखील देण्यात आली आहे. ही अखेरची निवडणूक आहे असे म्हणत असलेल्या नाईकांना भविष्यातील मुख्यमंत्रीपदाच्या संधीची देखील आशा असल्याचे त्यांच्या विधानातून दिसून येते.

दरम्यान, मनोहर पर्रीकर यांच्या अकाली निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे राज्याचे नेतृत्व देण्यात आले. सावंत गेल्या पाच वर्षापासून यशस्वीपणे पद सांभाळत आहेत. असे असले तरी सीएम पदाच्या शर्यतीत भाजपचे अनेक चेहरे असल्याने 25 वर्षे उत्तरेचा एकहाती गड राखणाऱ्या श्रीपाद भाऊंना ही संधी मिळेल का? हे पुढील काळातच समजू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

60 Crore Fee Scam
Goa High Court Double Murder Acquittal
Damu Naik
Akshat Naik Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com