Kala Academy Waste Issue Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: नाट्यगृह की कचरा अड्डा? कला अकादमी परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

Kala Academy Garbage Issue: कला, संस्कृती आणि नाट्यप्रेमींसाठी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कला अकादमी परिसराची सध्या दुर्दशा झाली आहे.

Sameer Panditrao

Kala Academy Waste Issue

पणजी: कला, संस्कृती आणि नाट्यप्रेमींसाठी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कला अकादमी परिसराची सध्या दुर्दशा झाली आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होणाऱ्या या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात परंतु त्यांना आता कलेचा आनंद घेण्याऐवजी परिसरात साचलेला कचरा पाहून नाराजी व्यक्त करावी लागते.

सध्या कला अकादमीत अ गट नाट्य स्पर्धा सुरू आहेत. नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक आणि कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. मात्र त्यांच्या स्वागताला स्वच्छता नव्हे, तर कचऱ्याचा ढीग उभा आहे. कला अकादमीच्या पार्किंग क्षेत्रात साठवलेला कचरा हा परिसराला ‘कचरा अड्डा’ असे नाव देण्यास भाग पाडत आहे.

स्थानिक नागरिक, पर्यटक आणि नाट्यप्रेमींच्या मते कला अकादमीच्या प्रतिष्ठित ठिकाणी कचरा साचून राहणे ही लाजिरवाणी बाब आहे. पार्किंगसाठी उपलब्ध जागेत कचरा साठवण्यामुळे येथील स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कला अकादमीचा परिसर स्वच्छ आणि आकर्षक ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तरीदेखील कचऱ्याचा निपटारा का होत नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

कला अकादमीचा परिसर कचरा अड्डा बनवण्यासाठी उभा केला आहे का की तो कला आणि संस्कृतीचा विकास साधण्यासाठी, याचा विचार आता प्रशासन आणि मंत्र्यांनी करावा, अशी कलाप्रेमींची मागणी आहे.

कलाप्रेमींची नाराजी

कला पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कला अकादमीला कला आणि संस्कृतीचे केंद्र मानले जाते. मात्र सध्या इथे कलेपेक्षा कचऱ्याची अधिक चर्चा सुरू आहे. कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी कला अकादमीला ‘कलाकारांची खाण’ म्हटले असले तरी, त्याच खाणीच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे, याकडे त्यांचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

SCROLL FOR NEXT