Kala Academy Task Force Meeting Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: कला अकादमीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष; टास्क फोर्स नाराज, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

Kala Academy Renovation Work: कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचा भाग कोसळला, त्याचे पुढे काय याचा विचारच केला गेलेला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामात आढळलेल्या चुकांचा अभ्यास करण्यासाठी विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या १३ सदस्यीय समितीने ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्र्यांना अहवाल दिला होता.

त्या अहवालावर सरकारकडून कारवाईसाठी काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे शनिवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला.

'टास्क फोर्स'चे अध्यक्ष विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (२५ जानेवारी) सकाळी मनोरंजन सोसायटीच्या परिषद कक्षात बैठक पार पडली. यावेळी टास्क फोर्सचे सदस्य, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते, कला व संस्कृती खाते आणि कला अकादमीचे अधिकारी तसेच कंत्राटदार उपस्थित होते.

या बैठकीविषयी केंकरे म्हणाले, अकादमीने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात केलेल्या तपासणीनंतर बैठक घेऊन समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. त्यात नूतनीकरणात ज्या चुका दिसून आल्या, त्याविषयी अहवाल देण्यात आला.

प्रामुख्याने ध्वनी योजना, प्रकाश योजनेमध्ये काही चुका आहेत आणि त्या दूर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय आतील बाजूने जे इंटिरियर केले आहे, त्यातही काही चुका आढळल्या आहेत. या सर्व चुका दुरुस्त करता येऊ शकतात.

आम्ही फोर्सचा तपासणी अहवाल मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर त्यावर ज्या गतीने पावले उचलायला हवी होती, ती उचलली नाहीत. ही कामे चुटकीसरशी दूर होणार नाहीत, तर त्यासाठी जी प्रक्रिया आहे, ती व्हायला पाहिजे. टास्क फोर्सने ज्या चुका दाखविल्या होत्या, त्या अजूनही दूर झालेल्या नाहीत.

खुल्या रंगमंचाचा विचारच नाही !

कला अकादमी पूर्वी जशी होती तसेच तिचे रूप हवे, अशी आमची मागणी आहे. कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचा भाग कोसळला, त्याचे पुढे काय याचा विचारच केला गेलेला नाही. या बाबीवरही काही तरी पावले उचलणे आवश्यक आहेत.

याशिवाय या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट चेन्नईच्या आयआयटीमार्फत करून घेण्यात यावे, असे आम्ही सरकारला सूचित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT