Drama  Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: ‘पूर्णविराम’: कौटुंबिक ‘मेलोड्रॅमॅटिक’

संवादात अडथळे: व्यसनाधीन कलाकाराच्या भावनिक गुंतागुंतीची मांडणी

दैनिक गोमन्तक

Kala Academy: 'कॅन्सर’ या जीवघेण्या रोगाच्या शेवटच्या अवस्थेत असलेल्या, जन्म-मृत्यूशी झुंज देणाऱ्या मनोहर या चित्रकाराला आयुष्य आपल्या परीने जगायचे आहे. मानवी भावभावनांत गुंतलेल्या मनोहरने जगण्याचे स्वतःचे काही नियम बनवले आहेत. पत्नी अनिता ही कलाकार नसल्याने तिला आपल्या भावना कळत नसल्याचे समजून तो माधवी या कलाकार मुलीशी संबंध ठेवून असतो.

स्वतःचे जगणे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी हा स्वार्थी, व्यसनी कलाकार पत्नी अनिता आणि प्रेयसी माधवी या दोघींच्याही आयुष्याचा नाश करतो. आत्यंतिक व्यसन आणि कॅन्सरमुळे त्याच्या आयुष्याला ‘पूर्णविराम’ मिळतो, पतीच्या मरणाचा धक्का सहन न झाल्याने पत्नी अनिताच्या मृत्यूने तिच्या आयुष्यातील ‘अर्धविरामाचा पूर्णविराम’ होतो, माधवी समोर पूर्व आणि भावी आयुष्याचे ‘प्रश्नचिन्ह’ उभे राहते आणि प्रेक्षकांना सगळीकडे ‘उद्‍गार चिन्हे’ दिसू लागतात.

सांस्कृतिक कला मंच,सांगे या संस्थेने इरफान मुजावर यांचे मूळ एकांकिकेचा विषय असलेले, ओढून ताणून केलेले हे नाटक अत्यंत मेलोड्रॅमॅटिक वाटले. सध्या सगळ्याच कलाकृतीत कलाकार हा व्यसनीच असावा, असा प्रघात रूढ होत चाललाय आणि आत्यंतिक व्यसनाधीनतेत त्याला सर्वोत्तम कलाकृती आणि जगण्याचे नियम सुचणे हे सर्वमान्य होत चाललेय, असे वाटू लागलेय.

अशुद्ध भाषा; चुकीच्या संवादफेकीने प्रयोगाला गालबोट!

संहितेचा ‘परंपरा आणि नैतिक मूल्य व्यवस्था’हा अतिशय गंभीर विषय आत्मविश्वासाने मांडण्यात दिग्दर्शक विनय विष्णू गावस यांना जमले नाही. त्यांनी संहितेला दिलेली ‘ट्रीटमेंट’ ‘मेलोड्रामा’ च्या दिशेने गेल्याने ‘अ’ गट नाट्य स्पर्धेतील अपेक्षित परिणाम दिसला नाही.

पात्रांची निवड ठीक होती पण चुकीची संवादफेक व अशुद्ध भाषा यामुळे प्रयोगास गळती लागली. ‘सपली, मला पावस नाही आवडत, आयुष्यान , जेरा शांत वा, आनि तुजी सवय, तुज्या मागारी, माजही सर्वस्व आहे, मातीत वेड , मोटी संदी हुकली, तुज्या-माज्या, भविश्य अंदूक, काय जालंय, आदींसारखे अनेक अशुद्ध शब्द व वाक्ये बोलली गेली.

नाटकातील पात्रांची व्यक्तिचित्रणे ढोबळ वाटली. प्रत्येक पात्र स्वतःचे व्यक्तिमत्त्व कसे आहे हे, संवादांतून प्रेक्षकांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जाणवले. इरफान मुजावर यांचे हे नाटक कौटुंबिक जिव्हाळ्याची भावना जपताना दिसले.

कॅन्सरग्रस्त चित्रकार मनोहरची व्यक्तिरेखा सुरेश नाईक यांनी साकारली. भाषा व शब्दफेक यावरील अभ्यासात कमतरता जाणवली. अजित मंडळ यांचा लकी अजून नीट साकारता आला असता. संवादातील अडथळे टाळल्यास बरे झाले असते. समाजात स्त्रीला शिक्षणाचे, नोकरी-व्यवसायाचे स्वातंत्र्य लाभत असले तरी नैतिक स्वातंत्र्य केवळ पुरुषांना लाभते, हा आपल्या व्यक्तिरेखेतील मुद्दा पटवून देण्यास माधवी साकारणारी अंकिता धोंड कमी पडल्याचे जाणवले.

दीपक गावस यांनी पार्श्‍वसंगीतात पावसाच्या आवाजाचा कल्पकतेने वापर केला. फोनचा रिंगटोन ‘लाऊड’ वाटला. व्हेंटिलेटर इफेक्ट छान. कलाकार मनोहर यांचा आक्रमक पुरुषीपणा, तणावग्रस्त वातावरण यासाठी पार्श्वसंगीताच्या वेगळ्या वाटा शोधण्यास वाव होता.

अजय कुर्डीकर यांची प्रकाश योजना ठीक. पण बऱ्याच वेळा पात्रांच्या चेहऱ्यावर अंधार जाणवला. नेपथ्य देवराज माजिक यांनी केले. ‘ICU’ छान, पण बाहेरून आयसीयूमध्ये जाताना पायरी असणे असंभव. स्ट्रेचर आणि पेशंट खाली पडेल की हो. नाटकाच्या दृश्यांच्या ‘टाईमलाईन’ साठी नेपथ्याचा अधिक कलात्मक वापर शक्य होता.

पोपटाच्या पिंजऱ्याचे चित्र व्यक्तिरेखांचे अंतरंग समजण्यास योग्य वाटले. तरीही स्पर्धेच्या नाटकास अधिक बारकाईने अभ्यास करावयास हवा.वेशभूषा विश्वनाथ नार्वेकर आणि रंगभूषा लाडू राणे यांनी केली. कॅन्सरग्रस्त मनोहर अचूक दिसला.

रंगभूमीच्या वाटचालीत नावीन्याची प्रक्रिया अखंडितपणे चालू राहणे हा कला अकादमीच्या ‘अ’ गट नाट्य स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. आधुनिक जीवनाच्या प्रवासाबरोबर रंगभूमीवरील गतिमान स्थित्यंतरे आकाराला येत असताना तिचे स्वरूप वैविध्य आणि व्यामिश्र होणे गरजेचे आहे.

याचा विचार करून सांस्कृतिक कला मंच , सांगे गोवा, या संस्थेच्या रंगकर्मींनी आणि कलाकारांनी पुढील वर्षी अत्यंत मेहनतीनिशी कला अकादमी स्पर्धेत यावे. ग्रामीण भागातून नाट्यकलेच्या विकासास हातभार लावणाऱ्या या कलाकारांना पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT