Bicholim: माजी नगरसेवकाकडून गाळा हडप

न्यायालयात धाव : डिचोलीतील मृत गाळेधारकाच्या मुलांनी आरोप केला आहे.
Bicholim Market
Bicholim Market Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Bicholim: डिचोलीचे अजित (बाळू) बिर्जे यांनी आपल्या अधिकार आणि राजकीय वजनाचा वापर करुन बेकायदेशीररित्या आमच्या वडिलांच्या नावावरील गाळा हडप केला आहे, असा आरोप संबंधीत गाळेधारक स्व. कांता च्यारी यांचा मुलगा यशवंत, मुलगी तनुजा आणि तन्वी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

यावेळी स्व. कांता यांचे जवळचे नातेवाईक मनोज च्यारी आणि मुकेश च्यारी उपस्थित होते. दरम्यान, पालिका प्रशासन आणि अन्य यंत्रणांकडून न्याय मिळत नसल्याने मूळ गाळेधारकाच्या मुलांंनी याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयात सादर केलेली याचिका न्यायालयाने दाखल करुन घेतली आहे, अशी माहिती मनोज च्यारी यांनी दिली.

रक्ताच्या नात्यावर अन्याय

डिचोली बाजारातील पुनर्वसित गाळ्यांमध्ये स्व. कांता च्यारी यांच्या नावावर एक गाळा होता. हा गाळा त्यांनी आपल्या आरोग्याच्या तक्रारीमुळे 1 ऑक्टोबर 1993 रोजी एका प्रतिज्ञापत्राद्वारे अकरा महिन्यांसाठी अजित बिर्जे यांना चालविण्यासाठी दिला होता. त्यानंतर बिर्जे यांनी नगरपालिकेकडे हा गाळा आपल्या नावावर करून देण्यासाठी अर्ज केला होता.

या अर्जावर नगरपालिकेने नगरविकास खात्याकडे निर्ण मागितला असता तो मंजूर झाला होता; परंतु गाळा त्यांच्या नावावर करण्यात आला नव्हता. 8 वर्षांनंतर बिर्जे यांनी या गाळ्याची हमी ठेव व नावावर करण्याचे शुल्क भरण्याची तयारी दाखवली. त्यावेळी डिचोली पालिकेने नगरनियोजन खात्याला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.

Bicholim Market
South Goa: अस्वच्छतेवरुन 'ही' नदी सदैव प्रसिद्धीच्या झोतात

त्यावर पालिका प्रशासनाच्या अतिरिक्त संचालकांनी पालिकेला 2011 रोजी गोवा पालिका कायदा 1970 नुसार आठ वर्षांनंतर हा गाळा गाळेधारकाच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीशिवाय इतर कोणाच्याही नावावर होऊ शकत नाही, असे कळविले होते.

तरीही 2013 साली बिर्जे यांनी मुख्याधिकाऱ्यांना हा गाळा 1995 पासून आपल्याच ताब्यात असून हा गाळा हेच आपले एकमेव उपजीविकेचे साधन आहे, असे सांगितले होते. परंतु 30 मार्च 2000 च्या अधिसूचनेनुसार 14 नोव्हेंबर 2002 रोजी हा गाळा कांता च्यारी यांच्या नावावरून अजित बिर्जे यांच्या नावावर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे, असे मनोज च्यारी आणि मुकेश च्यारी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India Slams Pakistan UN General Assembly
Mayna Construction Project
SIM card misuse 3 years jail
Goa Wooden Ganesh Sculptures
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com