Bharat Jadhav, Sharad Ponkshe, Kala Academy Goa Issues Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: AC सुरू करा! प्रेक्षकाने भरत जाधव यांचे नाव घेऊन केली सूचना; 'पुरुष'नंतर कला अकादमीत प्रेक्षकांचा पुन्हा रसभंग

Goa Kala Academy Problems: विशेष बाब म्हणजे, पडद्याआड जी काही बातचित होत होती, ती रसिकांपर्यंत ऐकू येत होती. या बाबी तांत्रिक आहेत, असे सांगून कला अकादमीकडून सारवासारव करण्यात आली.

Sameer Panditrao

पणजी: मागील रविवारी ‘पुरुष'' या नाटकावेळी प्रकाश योजनेत ‘फ्लिकर''चा व्यत्यय आल्याने नाटक थांबवावे लागले होते. आज दुपारी साडेतीन वाजता ज्येष्ठ नाट्यकलाकार भरत जाधव यांचे ‘श्रीमंत दामोदर पंत’ हे नाटक सभागृहातील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अर्धा तास उशिरा सुरू झाले. त्यामुळे पुन्हा प्रेक्षकांचा रसभंग झाल्याने कला अकादमीच्या अनागोंदी कारभारावर सडकून टीका करण्यात आली.

भरत जाधव यांचे गाजलेले ‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकाचा प्रयोग आज दुपारी साडेतीन वाजता अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात होता. नाटक सुरू होण्यापूर्वी प्रेक्षक सभागृहात येऊन बसले तरी सुमारे अर्धा तास सभागृहातील वातानुकूलन यंत्रणा सुरू झालेली नव्हती. दुपारच्या उन्हाच्या झळा सोसत आलेल्या प्रेक्षकांना सभागृहातील थंड हवेत निदान बसता येईल, असे वाटले होते; पण त्यांचा पुरता अपेक्षाभंग झाला.

सभागृहात आणखीनच उकाडा जाणवत होता, असे रसिकांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. हाती आलेल्या माहितीनुसार, मागील बाकावर बसलेल्या एका रसिकाने थेट भरत जाधव यांचे नाव घेऊन आता तरी ‘एसी’ सुरू करा, अशी सूचना केली. त्यामुळे आयोजक म्हणून पुढील रांगेत बसलेल्या एका संस्थेच्या सदस्यांना रंगमंचावर धाव घ्यावी लागली.

विशेष बाब म्हणजे, पडद्याआड जी काही बातचित होत होती, ती रसिकांपर्यंत ऐकू येत होती. या बाबी तांत्रिक आहेत, असे सांगून कला अकादमीकडून सारवासारव करण्यात आली असली, तरी हे असे कधीपर्यंत चालेल, असा प्रश्नही एका प्रेक्षकाने उपस्थित केला.

स्वच्छताही नाही!

मिळालेल्या माहितीनुसार, अकादमीच्या सभागृहात एका शाळेच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. त्यामुळे या कार्यक्रमासाठी पालकांकडून विविध साहित्य आणले होते. त्याचा कचरा सभागृहात तसाच राहिला होता. सभागृहाची स्वच्छताही केली नव्हती, असे अनिता सैल आणि सुरेखा पेडणेकर यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी ते थंडगार असायचे. आता तसे थंडगार सभागृह जाणवलेच नाही, असेही त्यांनी सांगितले.

पोंक्षेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष

ज्येष्ठ नाट्यकलाकार शरद पोंक्षे यांनी नाटक सुरू होण्यापूर्वी सर्व यंत्रणा सुरळीत आहे की नाही, हे तपासण्याची सूचना कला अकादमीला केली होती. मात्र, ती अंमलात आणली नसल्याचे रविवारीही दिसून आले. नाटकापूर्वी ‘एसी’ सुरळीत चालतो की नाही, प्रकाश व्यवस्था नीट आहे की नाही, याबाबत कोणतीही पूर्वतपासणी केली नसल्याचा ठपका प्रेक्षक ठेवत होते.

‘पुरुष’ नाटकावेळीही असाच अनुभव :

आज नाटकाचा पडदा उघडण्याच्या १५ मिनिटांआधी ‘एसी’ बंद असल्याची घोषणा करण्यात आली. याचा अर्थ नाटक सुरू होण्यापूर्वी ‘एसी’ सुरूच झाला नव्हता. मी ‘पुरुष’ नाटकाला आलो, त्यावेळीही मला असाच अनुभव आला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री हे एक नाट्यकलाकार आहेत आणि त्यांच्याच कारकिर्दीत असे घडत असेल तर ते खूप खेदजनक आहे.

सतत भ्रमनिरास योग्य नाही!

नाटक सुरू होण्याच्या १५ मिनिटांआधीच एसी सुरू करणे योग्य नाही. बाहेर इतका उकाडा असतानाही कला अकादमीच्या एकाही माणसाला अर्धा तास आधी एसी सुरू करावा, असे का वाटले नाही. कला अकादमी ही महत्त्वपूर्ण वास्तू आहे. येथे कलाकारांचा तसेच प्रेक्षकांचा असा वारंवार भ्रमनिरास होणे योग्य नाही. (चष्मा घातलेले)

तंत्रज्ञांनी चक्क आर्द्रतेलाच दिला दोष

१ कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर ज्यावेळी तज्ज्ञांनी कला अकादमीची पाहणी केली होती, त्यावेळीच वातानुकूलन व्यवस्था सदोषपूर्ण असल्याचे त्यांनी व्यवस्थापनाला सांगितले होते. त्याचे प्रत्यंतर आज घडले.

२ कला अकादमीचे तंत्रज्ञ म्हणतात की, एसी नादुरुस्त होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. कमालीची गोष्ट म्हणजे, त्यांनी गोव्याच्या आर्द्रतेलाही दोष दिला. त्यांना दोषामागचे नेमके कारण ठाऊक नाही, असे दिसले.

३ प्रेक्षकांच्या तक्रारीनंतर आज कला अकादमीच्या रंगमंच व्यवस्थापकाला तातडीने आपल्या घरून धावपळ करीत यावे लागले. हा बिघाड तात्पुरता नव्हता. कारण नाटकाच्या शेवटपर्यंत सभागृहात पाहिजे त्या प्रमाणात थंडावा निर्माण झाला नव्हता.

कला अकादमीचे नूतनीकरण केले, असे सांगण्यात येते. मात्र, नेमके कशाचे नूतनीकरण केले, हे आम्हाला तरी कळत नाही. यापूर्वी असलेली ध्वनियंत्रणा आतापेक्षा खूप चांगली होती. आज मी नाटकासाठी आलो होतो. परंतु ध्वनियंत्रणा खास वाटली नाही. एकंदरीत प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे काहीही सुधारणा झाल्याचे दिसत नाही.
संजीव चिखलीकर, प्रेक्षक, म्हापसा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT