Kadamba Transport Corporation has announced to stop bus pass concession for government employees Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport Corporation: कंदब वाहतूक मंडळाची घोषणा; सरकारी कर्मचाऱ्यांची पास सवलत बंद

Government Employees: या कर्मचाऱ्यांना सध्या जारी केलेले विद्यमान पास त्यांच्या वैध कालावधीपर्यंत सुरू राहतील आणि त्यानंतर कोणतेही नूतनीकरण केले जाणार नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Transport Corporation: गोवा सरकारने येत्या १ जुलैपासून राज्य आणि केंद्र सरकारचे विभाग, स्वायत्त संस्था, महामंडळे आणि अनुदानित संस्था यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता मिळत असल्याने कदंब वाहतूक महामंडळाने बस पासची सवलत बंद करण्याची घोषणा केली आहे.

या कर्मचाऱ्यांना सध्या जारी केलेले विद्यमान पास त्यांच्या वैध कालावधीपर्यंत सुरू राहतील आणि त्यानंतर कोणतेही नूतनीकरण केले जाणार नाही, असे महामंडळाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

कदंब बसेसच्या कमतरतेमुळे महामंडळाने आंतरराज्य मार्गांसह सुमारे ६० मार्गांवर सेवा देणे बंद केले आहे. १५ वर्षांहून अधिक जुन्या बसेस भंगारात काढण्याचा नियम असल्याने ५० ते ६० बसेस भंगारात काढल्या आहेत. स्कूल बसेससाठीही मागणी आहे. सरकारने अलीकडेच ५० डिझेल बसेस मंजूर केल्या आहेत. या आंतरराज्य मार्गांचा वापर करून मुंबई, पुणे, हुबळी हे मार्ग पुन्हा सुरू केले जातील, अशी माहिती अध्यक्ष उल्हास तुयेकर त्यांनी दिली.

हैदराबादच्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेकने कदंब महामंडळाला १५० ईव्ही बसपैकी फक्त ५६ बसेसचा पुरवठा केला आहे. सर्व १५० बसेस मेपर्यंत पोहोचवल्या जाणार होत्या. यासंदर्भात कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: आरक्षित डब्बा न जोडताच धावली कोकण रेल्वे; प्रवाशांना उभं राहून करावा लागला प्रवास

Goa Bus Accident: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी, वेर्णा येथे भीषण अपघात; चालकाविरोधात गुन्हा दाखल

Cricketer Threat: 5 कोटी दे...टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला अंडरवर्ल्डकडून धमक्या, दाऊद टोळीचं नाव समोर

Opinion: मायक्रोसॉफ्ट नाही, 'झोहो शो'! केंद्रीय मंत्र्यांनी दिला स्वदेशी सॉफ्टवेअरला 'प्राइम टाइम' बूस्ट

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

SCROLL FOR NEXT