Goa Electric Bus Dainik Gomantak
गोवा

Goa Electric Buses: प्रवाशांना मोठा दिलासा! कदंबच्या ताफ्यात 2 महिन्यांत आणखी 200 ई-बसेस; आमदार उल्हास तुयेकर यांची माहिती

Goa Electric Bus: पुढील दोन महिन्यांत कदंबच्या ताफ्यात आणखी २०० नवीन इलेक्ट्रिक बसेसची भर पडणार आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी पत्रकारांना दिली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: पुढील दोन महिन्यांत कदंबच्या ताफ्यात आणखी २०० नवीन इलेक्ट्रिक बसेसची भर पडणार आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी पत्रकारांना दिली. सध्या कदंबकडे १५० इलेक्ट्रिक बसेस च ४८ डिझेल बसेस आहेत. सरकारने कदंबसाठी अर्थसंकल्पात २०० इलेक्ट्रिक बसेस खरेदीसाठी तरतूद केली आहे. यासंदर्भातील फाईल सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली असून, ती मंजूर झाल्यानंतर तत्काळ निविदा प्रक्रिया राबवून बसेस खरेदी करण्यात येतील, असे तुयेकर यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या ग्रामीण भागात चार्जिंग स्टेशनची सुविधा नसल्याने तसेच रस्ते अरुंद असल्याने त्या भागांत डिझेल बसेसच पाठवाव्या लागतात. त्याचप्रमाणे इतर राज्यांतही इलेक्ट्रिक बसेस पाठविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, संबंधित राज्यांनी चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. एकदा चार्ज केल्यानंतर बस २०० किलोमीटरपर्यंत धावू शकते, असे तुयेकर म्हणाले.

चार्जिंगसाठी हव्यात आवश्यक सुविधा

गोव्यातही इतर राज्यांतील इलेक्ट्रिक बसेस चार्ज करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे तुयेकर यांनी नमूद केले. ते म्हणाले, पेट्रोलियम कंपनीकडून कदंबला डिझेल प्रतिलिटर ११० रुपयांनी दिले जाते, तर इतरांना तेच डिझेल प्रतिलिटर ८८.२० रुपयांनी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे कदंबच्या बसेसमध्ये खासगी पेट्रोलपंपांवर डिझेल भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT