Kadamba transport buses and electric buses set to join the Goa public transport fleet Dainik Gomantak
गोवा

Kadamba: कदंबच्या ताफ्यात येणार 10 नव्या आंतरराज्य बसेस! ३० ईव्ही बसेसही, 50 नवीन बसेससाठी केंद्राकडे तुयेकर यांचा मोठा प्रस्ताव असल्याचे स्पष्ट

Kadamba Interstate Bus Service: कदंब परिवहन महामंडळाच्या आंतरराज्य बससेवेला लवकरच नवी चालना मिळणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी : कदंब परिवहन महामंडळाच्या आंतरराज्य बससेवेला लवकरच नवी चालना मिळणार आहे. जुन्या व कालबाह्य झालेल्या बसेस टप्प्याटप्प्याने सेवेतून काढून टाकल्यानंतर त्यांच्या जागी १० नव्या डिझेल बसेस आंतरराज्य मार्गांसाठी सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.

आंतरराज्य मार्गांवर सध्या ईव्ही (इलेक्ट्रिक) बसेस चालविणे व्यवहार्य नाही. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझेलवरील बसेस अधिक उपयुक्त असल्याने पहिल्या टप्प्यात १० नव्या बसेस ताफ्यात दाखल होतील.

शिवाय, राज्यांतर्गत सार्वजनिक वाहतूक अधिक पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने ३० ईव्ही बसेसही पुढील काही महिन्यांत सेवेत दाखल होणार आहेत, असे तुयेकर यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यासाठी आणखी ५० नव्या बसेस मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच राज्यातील नव्या बसस्थानकांच्या उभारणीची कामेही वेगाने सुरू असल्याचे तुयेकर यांनी स्पष्ट केले.

कदंबच्या अनेक जुन्या बसेस कालमर्यादा पूर्ण झाल्याने भंगारात काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी नव्या बसेसची खरेदी करण्यात येत आहे.

उल्हास तुयेकर, अध्यक्ष (कदंब परिवहन महामंडळ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Birthday: कधीकाळी क्रिकेट किट घ्यायलाही नव्हते पैसे, मॅगी खाऊन काढले दिवस; आज टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर! हार्दिक पांड्याचा संघर्षमय प्रवास

Nana Patekar Death: नाना पाटेकर यांचा मृत्यू कशामुळे झाला? गोमेकॉच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Nushrratt Bharuccha Health Update: 'पिक्चर अभी बाकी है…', अपघातानंतर नुसरत भरुचाची पहिली पोस्ट; PHOTO शेअर करत चाहत्यांना दिली हेल्थ अपडेट

Job Scam: 52 लाखांच्या फसवणूक प्रकरणाला नवे वळण! अजित शंखवाळकरचा पोलिस अधीक्षकासोबतचा फोटो चर्चेत

खरी कुजबुज: मुख्यमंत्री देणार 'नवरात्री गिफ्ट'?

SCROLL FOR NEXT