Kadamba Transport: पंढरपूर व वालंकिणी यात्रेसाठी कदंब महामंडळातर्फे खास बसेस

Goa to Pandharpur Special Buses: पणजी-सोलापूर आणि पणजी-अक्कलकोट या नियमित सेवांचे मार्गही पंढरपूरमार्गे वळविले जाणार आहेत.
 Goa to Pandharpur Special Buses
Kadamba Transport Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आषाढी एकादशी यात्रेनिमित्त २४ आणि २५ जुलै रोजी गोव्याहून पंढरपूरसाठी विशेष बसेस मार्गस्थ केल्या जाणार असल्याची माहिती कदंब परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर यांनी दिली. कासकर यांनी सांगितले, की पंढरपूरसाठी एका बाजूचे भाडे ५०० रुपये निश्चित केले आहे.

तसेच पणजी-सोलापूर आणि पणजी-अक्कलकोट या नियमित सेवांचे मार्गही पंढरपूरमार्गे वळविले जाणार आहेत. पंढरपूरसाठी २४ जुलै रोजी तीन बसेस तर उर्वरित सात बसेस २७ जुलै रोजी रवाना होतील.

 Goa to Pandharpur Special Buses
Pandharpur Wari: वारकऱ्यांना सरकारकडून 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत; प्लास्टिकमुक्त वारीला द्या प्राधान्य- मुख्यमंत्री डॉ. सावंत

याव्यतिरिक्त ‘मड्डी उत्सव’ आणि ‘वालंकिणी उत्सव’ यासाठी चेन्नईला जाण्याकरिता कदंबच्या ३०-बर्थच्या एसी स्लीपर बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. ते म्हणाले, की मड्डी उत्सवासाठी २७ ऑगस्ट रोजी दोन बसेस आणि वालंकिणी उत्सवासाठी ५ सप्टेंबर रोजी एक बस रवाना होईल. यासाठी येण्या-जाण्याचे भाडे प्रतिप्रवासी ६ हजार रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com