पणजी: ‘आयटक’चे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका तसेच कदंब कर्मचारी संघटनेचे संतोष नाईक यांच्या समवेत वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी आंदोलकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली त्यामुळे संप करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.
यासंदर्भात मंत्री गुदिन्हो यांनी कदंब कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी भविष्य निर्वाह निधीची रक्कम निर्धारित वेळेत सरकारकडून जमा केले जाईल, असे आश्वासन दिले. ई वाहनांवर चालक भरतीसंबंधी आधीच्याच चालकांना प्राधान्याने संधी देण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे.
कदंब महामंडळाच्या मागील बैठकीत चर्चा झाल्यानुसार डिजिटायझेशन करण्यात येणार असून कदंबच्या सेवेत सुधारणा केली जाईल. महाराष्ट्राच्या धर्तीवर अपेक्षित बदल करून २० टक्के महसूल वृद्धीचेही उद्दिष्ट गाठण्याचे ध्येय आहे. कदंब कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून अधिक निधीची तरतूद करण्याचे आश्वासनही मंत्री गुदिन्हो यांनी दिले.
कदंब कर्मचाऱ्यांनी सरकारवर तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दर्शवल्याचा आपल्याला आनंद आहे,असेही मंत्री गुदिन्हो म्हणाले. जर कदंब कर्मचारी नियोजित संपावर गेले असते, तर मोठे संकट ओढवले असते. मात्र, चर्चा आणि विश्वासातून तोडगा काढणे सोपे आहे. संघटनेच्या योग्य मागण्या टप्प्या-टप्प्याने मार्गी लावण्यात येतील. मात्र, कर्मचाऱ्यांनी कदंब महामंडळाच्या विकासासाठी आणि महसूलवृद्धीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री गुदिन्हो यांनी यावेळी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.