Goa Kadamba Bus Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus Transport: वाळपईत लवकरच कंदबाची इलेक्ट्रीक बससेवा सुरू करणार; व्यवस्थापकीय संचालक संजय घाटे यांची माहिती

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्यामुळे सत्तरीतील गावागावात कदंबा सेवा सुरु करण्यात आली होती.

Kavya Powar

Kadamba Bus Transport in Valpoi

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्यामुळे सत्तरीतील गावागावात कदंबा सेवा सुरु करण्यात आली होती. या सेवेमुळे 80 टक्के शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे.

ग्रामीण भागात कंदबामुळे वाहतुकीची चांगल्या प्रकारे सोय होत असून येणाऱ्या दिवसात जास्तीत जास्त कदंबा, खास करुन इलेक्ट्रीक बस वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा विचार करुन त्यांना कदंब पास देण्याची सोय करण्यात येणार आहे.

यासाठी वाळपई कंदबा बसस्थानकावर पास सेवा येणाऱ्या दिवसात सुरु केली जाणार असल्याचे प्रतिपादन कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय घाटे यांनी वेळुस वाळपई येथील श्री हनुमान विद्यालयातील मुलांना जारी केलेल्या कदंब बस पासच्या वितरण कार्यक्रमात बोलताना केले.

यावेळी व्यासपीठावर वाळपई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरहरी हळदणकर, मुख्याध्यापिका सुविधा बर्वे, व्यवस्थापक देवेश पेडणेकर, सचिव सदाशिव वेलिंगकर, साधना जोशी आदींची उपस्थिती होती. यावेळी ग्रामीण भागातील एकूण चाळीस मुलांना पहिल्या टप्प्यातील 40 पास वितरण करण्यात आले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT