Kadamba Bus Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus : चार दिवसांपूर्वी बंद पडलेली कदंब बस अजूनही रस्‍त्‍यावर; बेभरवशी सेवेबद्दल संताप

Kadamba Bus : डिचोली व्हाया मये-पैरामागे म्हापसा मार्गावर वाहतूक करणारी जीए-०३-एक्स-०५५९ या क्रमांकाची प्रवासी बसगाडी चार दिवसांपूर्वी मये पंचायत इमारतीसमोरील जंक्शनजवळ बंद पडली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Bus :

डिचोली, गैरव्यवस्थापन म्हणा किंवा अनागोंदी कारभार म्हणा, कदंब वाहतूक महामंडळाची प्रवासी बससेवा दिवसेंदिवस बेभरंवशाची बनत चालली आहे. ग्रामीण भागातील मार्गावर तर हा प्रकार नित्‍याचाच झाला आहे.

मये येथेही कदंबची एक बस वाटेतच बंद पडली असून, गेल्या चार दिवसांपासून ती रस्त्यावरच आहे.

कदंबची प्रवासी बससेवा प्रवाशांचा कधी घात करेल, त्याचा नेम नाही. अधूनमधून प्रवाशांना हा कटू अनुभव येत असतो. डिचोली व्हाया मये-पैरामागे म्हापसा मार्गावर वाहतूक करणारी जीए-०३-एक्स-०५५९ या क्रमांकाची प्रवासी बसगाडी चार दिवसांपूर्वी मये पंचायत इमारतीसमोरील जंक्शनजवळ बंद पडली आहे. आज गुरुवारी सायंकाळपर्यंत ती तेथेच होती.

या बसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ती बंद पडल्‍याची माहिती मिळाली आहे. मात्र चार दिवसांत या बसगाडीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही की ती तेथून हलविण्यातही आलेली नाही. या प्रकाराबद्दल म्हापसा मार्गावर नियमित वाहतूक करणारे प्रवासी तसेच नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT