Bicholim Bus Station Construction Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: डिचोलीतील बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर! पुढील वर्षी लोकार्पणाचा आमदारांना विश्‍‍वास

Bicholim Bus Stand: डिचोलीतील या आंतरराज्य बसस्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही त्यासाठी चांगले सहकार्य मिळत आहे. सुमारे १७ कोटी रुपये खर्च करून राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: गेल्या अडीच वर्षांपासून रेंगाळत पडलेल्‍या शहरातील नियोजित अत्याधुनिक कदंब बसस्थानकाच्या कामाला आता गती मिळाली आहे. सध्याचे काम पाहता, पुढील वर्षापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्‍यता आहे, असे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी स्पष्ट केले आहे

डिचोलीतील या आंतरराज्य बसस्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही त्यासाठी चांगले सहकार्य मिळत आहे. सुमारे १७ कोटी रुपये खर्च करून राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. अडीच वर्षांपूर्वी या बसस्थानकाच्या कामाला प्रारंभ झाला तरी अजून या प्रकल्पाचे काम अद्याप पूर्णत्वास आलेले नाही, असे शेट्ये म्‍हणाले.

डिचोलीत अत्याधुनिक बसस्थानक व्‍हावे, अशी डिचोलीवासीयांसह प्रवाशांची मागणी होती. बसस्थानकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात करण्यापूर्वी दोनवेळा या बसस्थानकासाठी पायाभरणीही करण्यात आली होती. एप्रिल २०२२ मध्ये कामाला प्रारंभ झाला. मात्र पावसाळ्यात जमिनीतून पाणी झिरपू लागल्याने प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण झाला. मध्यंतरी अन्य तांत्रिक अडचणीही निर्माण झाल्याने बसस्थानकाच्या कामाची गती मंदावली. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लांबणीवर पडले.

दुकानांसाठी जागा, आरटीओ कार्यालय

आता या बसस्थानक प्रकल्पाचे काम जोरात सुरू असून, जवळपास ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. कामाची गती अशीच कायम राहिल्यास पुढील वर्षांपर्यंत काम मार्गी लागण्‍याची शक्यता आहे. बसस्थानक प्रकल्प इमारतीच्या तळमजल्यावर दुकानांसाठी जागा, पहिल्या मजल्यावर आरटीओ कार्यालय, दुसऱ्या मजल्यावर कदंब चालक वाहकांसाठी आराम खोली आणि सभागृह आदी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

चोर्लामार्गे कर्नाटकमधील बेळगावहून गोव्यात येणाऱ्या प्रवासी बसगाड्यांसाठी डिचोलीतील बसस्थानक हे गोव्यातील प्रथम बसस्थानक आहे. त्यामुळे या बसस्थानकावर आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या बसस्थानकावर अन्य सुविधांसह प्रवाशांसाठी आराम कक्ष उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच वाचनालयही सुरू करण्याचा विचार आहे.
डॉ. चंद्रकांत शेट्ये (आमदार, डिचोली)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT