Kadamba Bus Service Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus Service : ‘कदंब’ची प्रवासी बससेवा बेभरवशाची; प्रवाशांचे हाल

Kadamba Bus Service : साळ-मडगाव मार्गावरील बसच्या अनियमितपणात वाढ

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Bus Service : ‘ डिचोली तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवासी बससेवा कोलमडली आहे. साळ ते मडगाव मार्गावरील कदंबच्या बसगाडीच्या अनियमितपणात वाढ झाली आहे. अधूनमधून ही बस चार-चार दिवस गायब होत असते, अशी प्रवाशांची तक्रार आहे.

ही प्रवासी बससेवा बेभरवंशाची बनली असून, अधूनमधून कदंबच्या बसेस वाटेतच बंद पडत आहेत.

काल गुरुवारी डिचोली-साखळी रस्त्यावरील वाठादेव परिसरात कदंबची एक प्रवासी बस रस्त्यावरच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. कदंब वाहतूक महामंडळाने प्रवासी बससेवा सुरळीत करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

डिचोली-साखळीमार्गे साळ ते मडगाव मार्गावर वाहतूक करणाऱ्या कदंबची बससेवा प्रवाशांना सोयीस्कर असली, तरी या बसच्या अनियमितपणात वाढ झाली आहे. त्यामुळे साळसह ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

बसच्या अनियमितपणामुळे नोकरीधंद्यानिमित्त शहराच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसह विद्यार्थीवर्गाचेही हाल होत आहेत.

साळ येथून सकाळी साडेसहा वाजता सुटणारी कदंबची ही प्रवासी बस लाडफे, डिचोलीहून कारापूरमार्गे साखळीहून मडगाव अशी वाहतूक करते.

सायंकाळी माघारी परतणारी ही बस रात्री साडेआठ वाजेपर्यंत साळ येथे पोचते. ही बस साळसह कासारपाल, लाडफे, सर्वण आणि कारापूर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांना सोयीस्कर ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT