Kadamba Employees Strike DainikGomantak
गोवा

Kadamba Bus: मडगाव ते पत्रादेवी जलद बस ‘लोकल’ केल्याने गैरसोय, वेळापत्रक बिघडले; प्रवाशांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Margao To Patradevi: प्रवाशांनी रॉक लुईस यांना विनंती करून ही बस जलद सुरू ठेवावी, असा आग्रह केला. पण त्यांनी उलट प्रवाशांनाच उडवाउडवीची उत्तरे दिली, अशी माहिती प्रवाशांनी दिली.

Sameer Panditrao

पेडणे: पत्रादेवी ते मडगाव मार्गावर सकाळ व संध्याकाळ जलद वाहतूक करणारी कदंब बस कदंब महामंडळातील एक कर्मचारी रॉकलेस लुईस यांनी कदंबच्या मडगाव आगारात हस्तक्षेप करून मडगाव ते म्हापसा दरम्यान ही बस स्थानिक (लोकल) केल्याने अन्य बस गाड्यांचे वेळापत्रक चुकत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

रात्रीच्यावेळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून पणजी, म्हापसा, पेडणे व संबंधित इतर मार्गावरील प्रवाशांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच कदंबचे संचालक, मानव आयोग यांना निवेदनवजा तक्रार करून या मार्गावरील कदंब बस पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

मडगाव पत्रादेवी मार्गावरील या बसमुळे विद्यार्थी व कामगार वर्ग यांना बराच फायदा होत होता, पण हल्लीच कदंब महामंडळाचे कर्मचारी रॉकलेस लुईस यांनी मडगाव आगाराच्या कामगारांना खडसावून ही बससेवा मडगाव ते म्हापसा दरम्यान स्थानिक सुरू केली आहे. यामुळे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना घरी पोहोचायला अर्धा ते तासभर उशीर होतो .यामुळे सर्वांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.

प्रवाशांनी रॉक लुईस यांना विनंती करून ही बस जलद सुरू ठेवावी, असा आग्रह केला. पण त्यांनी उलट प्रवाशांनाच उडवाउडवीची उत्तरे दिली, अशी माहिती प्रवाशांनी दिली.

रॉक लुईस हे मडगाव कदंब आगराचे आगर व्यवस्थापक पण सध्या मागचे दीड दोन वर्षे ते मडगाव आगर सोडून कदंबाच्या मुख्यालयात बसून विभागीय वाहतूक अधिकारी आहेत. रिक्त विभागीय वाहतूक अधिकारीपद सरकारकडून भरले जात नाही. त्यामुळे सर्व आगारांतील सहाय्यक आगर व्यवस्थापकांवर ताण येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

Goa Cancer Hospital: 'कॅन्‍सर इस्‍पितळ' वर्षभरात कार्यान्‍वित होणार! मंत्री राणेंनी दिली हमी; सामंजस्‍य कराराची प्रक्रियाही सुरू

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

SCROLL FOR NEXT