Jyoti Blagen as Sanquelim Deputy Mayor Dainik Gomantak
गोवा

साखळी उपनगराध्यक्षपदी ज्योती ब्लेगन

साखळी पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी झालेल्या चुरशीच्या लढतीत कॉग्रेस समर्थक ज्योती प्रवीण ब्लेगन यांनी 7 विरुध्द 6 मतांनी निवड झाली.

दैनिक गोमन्तक

साखळी : साखळी पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी झालेल्या चुरशीच्या लढतीत कॉग्रेस समर्थक ज्योती प्रवीण ब्लेगन यांनी 7 विरुध्द 6 मतांनी निवड झाली. ज्योती ब्लेगन यांनी भाजप समर्थक दयानंद बोर्येकर यांचा 7 विरुध्द 6 मतांनी पराभव केला. राजेश सावळ यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

साखळी पालिका कार्यालयात आज (शुक्रवारी) उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी कॉंग्रेस समर्थक ‘टुगेदर फॉर साखळी’ गटातर्फे ज्योती ब्लेगन यांनी अर्ज भरला तर भाजप समर्थक ‘साखळी विकास आघाडी’ गटातर्फे दयानंद बोर्येकर यांनी अर्ज भरला.

ब्लेगन यांना नगराध्यक्ष राजेश सावळ, धर्मेश सगलानी, कुंदा माडकर, राया पार्सेकर, राजेंद्र आमेशकर, अंसिरा रियाज खान या नगरसेवकांनी मतदान केले तर भाजप समर्थक बोर्येकर यांना आनंद काणेकर, यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, रश्मी देसाई, शुभदा सावईकर या नगरसेवकांनी मतदान केले. निवडणूक अधिकारी म्हणून दीपक वायंगणकर यांनी काम पाहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa Crime: सोन्याचे दागिने हिसकावले, आरोपीला 3 महिन्यांची शिक्षा; चौकशी अधिकाऱ्यालाही काढले वॉरंट

AI Misuse By Terrorists: जगासमोर मोठे संकट! दहशतवादी संघटना घेताहेत ‘एआय’ची मदत; सोशल मीडियावरून हल्ल्याची शक्यता

Goa Opinion: ‘कूल’ गोवा हा ‘कोल’ गोवा करून, विकासाच्या नावाखाली गोव्याचा जो विध्वंस चालला आहे त्याचे काय?

ZP Election: लेकीचे पहिले मतदान, वडिलांना 'विजयाचा' विश्वास! CM सावंतांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT