मिरामार सर्कलजवळ वाहतूक कोंडी नित्‍याची

टॅक्‍सी-प्रवासी बसची टक्‍कर : वाहतूक पोलिसही हतबल
Traffic Jam near Miramar Circle
Traffic Jam near Miramar Circle Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : मिरामार सर्कल परिसरात सध्या स्‍मार्ट सिटी पणजी अंतर्गत सुशोभीकरणाचे आणि नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे मिरामार सर्कल ते सायन्‍स सेंटरपर्यंतचा रस्‍ता अरुंद झाला आहे. या ठिकाणी शारदा विद्यामंदिर ही शाळा आहे. ही शाळा भरण्याच्‍या आणि सुटण्याच्‍या वेळी सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

या ठिकाणी एकूण पाच रस्‍ते एकत्र येतात. तसेच सर्कल ते सायन्‍स सेंटरपर्यंत रस्‍त्‍याच्‍याकडेला अनेक चारचाकी वाहने उभी केलेली असतात. शाळा सुटताना आणि भरताना सर्कल ते सायन्‍स सेंटरपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अनेक पालक शाळेसमोरच चारचाकी वाहने उभी करत असल्‍याने संपूर्ण रस्‍ता वाहनांनी भरतो. यामुळे बऱ्याचदा किरकोळ अपघातही होतात. आज दुपारी दीडच्‍या सुमारासही वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना साळगावकर महाविद्यालयाकडून येणाऱ्या टॅक्‍सी आणि पणजीकडून येणाऱ्या प्रवासी बसमध्ये टक्‍कर झाली. यात टॅक्‍सीच्‍या पुढील भागाचे नुकसान झाले. सामोपचाराने हे प्रकरण मिटविण्यात आले.

Traffic Jam near Miramar Circle
मडगावात अनोळखी व्यक्तीच्या खूनामुळे खळबळ

दरम्‍यान, या परिसरात पोलिसांसह वाहतूक पोलिसही असतात. मात्र प्रचंड वाहतूक कोंडीसमोर ते हतबल होतात. रस्‍त्‍यात लावलेली वाहने दूर करणे पोलिसांनाही शक्‍य होत नाही. वाहतूक कोंडीचा त्रास दुचाकीस्‍वारांसह पादचाऱ्यांनाही होतो. चालत किंवा दुचाकीने येणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना मनस्‍ताप सहन करावा लागतो. यातच स्‍मार्ट सिटी पणजीचे काम सुरू असल्‍याने यात अधिकच भर पडत आहे. संबंधित खात्याने यावर तातडीने तोडगा काढून किमान येथील शाळा भरतेवळी आणि सुटतेवेळी तरी उपाययोजना करावी, अशी मागणी पालिकांतून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com