JYOT lit at Lohia Maidan by Goemkarancho Ekvott  Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: 'गुदिन्‍हाे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका'; विजय सरदेसाई यांची मागणी

विरोधक आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी लोहिया मैदानावर एकत्रितपणाची ज्‍योत पेटवली

सुशांत कुंकळयेकर

GFA President Vijai Sardesai On Minister Mauvin Godinho: गोव्‍यात लोकशाही अति झाली आहे असे खोचक वक्‍तव्‍य करुन लोकशाहीचा अपमान करणारे पंचायत मंत्री मॉवीन गुदिन्‍हो यांचा हा उन्‍मतपणा असून अशा उन्‍मत्त मंत्र्याला मुख्‍यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून वगळले पाहिजे अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी लोहिया मैदानावरुन केली.

सोमवारी गांधी जयंतीचा मुहूर्त साधून विरोधी राजकारणी आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांनी लोहिया मैदानावर येऊन एकत्रितपणाची ज्‍योत पेटवली.

एक पाऊल एकचाऱ्याचे या संघटनेने आयोजीत केलेल्‍या या कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर उपस्‍थित होते.

गुदिन्‍हो यांच्‍या वक्‍तव्‍याचा समाचार घेताना सरदेसाई म्‍हणाले, "लोकशाही आहे म्‍हणूनच गुदिन्‍हो मंत्री होऊ शकले याचा त्‍यांना विसर पडला आहे का? या सरकारने गोवा विक्रीला काढला आहे. पेडणेपासून काणकोणपर्यंत सर्व ठिकाणी ही विक्री चालवली आहे."

"सरकारच्‍या या कारस्‍थानाला सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते विरोध करत आहेत. त्‍यामुळेच या मंत्र्याना ह्या कार्यकर्त्यांची अडचण होत आहे. लोकशाही अति झाली आहे हे वक्‍तव्‍य याच मानसिकतेतून केलेले आहे" असे सरदेसाई म्‍हणाले.

"गांधी म्‍हणजे फक्‍त स्‍वच्‍छतेचे प्रतिक नाही तर ते ज्‍वलंत लोकशाहीचेही प्रतिक आहेत. मात्र गोव्‍यातील भाजप सरकारने लोकशाहीचा गळा घोटण्यास सुरु केले आहे" असे सरदेसाई म्‍हणाले.

आज लोहिया मैदानावर एकत्रित होण्‍याबद्दल बोलताना सरदेसाई म्‍हणाले, "आंदोलक व विरोधक एकत्र येण्‍यास थोडा उशिर झाला असला तरी आजपासून एक चांगली सुरुवात झालेली आहे. गाेवेकर सुशेगाद असतीलही. पण एकदा ते एकत्र आले की मग ते कुणालाही ऐकत नाहीत हा आजवरचा गोव्याचा इतिहास आहे. आता जो एकत्रितपणा आहे तोही तसाच असेल" असे ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT