Private Bus Accident: तेलंगणातील खासगी प्रवासी बस धारबांदोडा येथे पलटी; प्रवासी जखमी तर चालकाचा मृत्यू

खासगी बस राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला कोसळली
Goa To Hyderabad Interstate Bus Overturns At Dharbandora
Goa To Hyderabad Interstate Bus Overturns At DharbandoraDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa To Hyderabad Interstate Bus Overturns At Dharbandora: दुर्गीणी धारबांदोडा येथे एका खासगी प्रवासी बसचा अपघात झाला आहे. खासगी बस राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला कोसळली.

या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. तर चालकाचा बसखाली चिरडून दुर्देवी मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

Goa To Hyderabad Interstate Bus Overturns At Dharbandora
Gandhi Jayanti 2023: धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कडक कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी गोव्याहून हैदराबादला जाणारी पर्यटक बस दुर्गीणी धारबांदोडा येथे आली असता बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला कोसळली.

या पर्यटक बसमध्ये 40 प्रवासी प्रवास करीत होते. अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झाले असून, दोघे बसखाली चिरडल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून बसखाली चिरडलेल्या महिलेला गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले.

तर चालकाचा बसखाली चिरडून दुर्देवी मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस, अग्निशामक दल, स्थानिकांमार्फत बचावकार्य सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sanjivani Sugar Factory
Private Capital Investment India
Mopa Airport passenger traffic increase
India Private Space Sector 2020 Reforms
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com