J.P. Nadda Dainik Gomantak
गोवा

'न्याय, सत्य, विकासासाठी भाजपलाच पुन्हा सत्तेवर आणा': जे.पी.नड्डा

"सबका साथ सबका विकास सबका विश्वास" हा भाजपचा मुलमंत्र आहे, असे उदगार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (J.P. Nadda) यांनी काढले.

दैनिक गोमन्तक

साखळी: न्याय, सत्य, विकास हा भाजपचा (BJP) धर्म आहे.यासाठी पुन्हा एकदा भाजपचीच निवड करा. या धर्मासाठी कार्य करताना अनेक ठिकाणी अधर्मी शक्ती डोके वर काढत असतात. या अधर्मी शक्तींना धर्माच्या मार्गावर आणले पाहिजे कारण "सबका साथ सबका विकास सबका विश्वास" हा भाजपचा मुलमंत्र आहे, असे उदगार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (J.P. Nadda) यांनी काढले.

भाजपने आजपासून निवडणूक प्रचाराची सुरुवात साखळी मतदार संघातील आमोणा येथून केली यावेळी कार्यकर्त्यांना संबोधून नड्डा बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant), केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Union Minister Shripad Naik), भाजपाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, गोव्याचे निवडणूक प्रभारी टी. रवी यांची उपस्थिती होती. केंद्र सरकार गोव्याच्या विकासासाठी कटीबध्द आहे. देशाच्या विकासात गोव्याचे भरीव योगदान असावे यासाठी गोव्यात पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेवर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावे.भाजप नेहमी देव, देश व धर्माला प्राधान्य देत आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करीत आहे.गोव्यातही डॉ.प्रमोद सावंत यांनी चांगले काम करुन जनतेमध्ये लोकप्रिय झाले आहेत असे नड्डा म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत म्हणाले भाजपच्या गोव्यातील निवडणूक तयारी चा शुभारंभ साखळी मतदार संघातून होतो आहे ही भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विकासाच्या जोरावर व कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर भाजप गोव्यात निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाला आहे. भाजप गोव्यात निश्चित बावीस प्लस निवडून पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला.

ढोल ताशांच्या मिरवणूकीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत व गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह श्रीदेवी सातेरी मंदीरात नेण्यात आले.नंतर मान्यवरांनी देवींचे दर्शन घेऊन गोव्यातील निवडणूकीचा शुभारंभ करण्यासाठी आशिर्वाद घेतले. यावेळी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणेने परिसर दणाणून सोडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: हडफडे दुर्घटनेतील आरोपी लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात! लवकरच भारतात आणण्याची शक्यता

Goa Nightclub Fire: क्लब मालकाकडून 25 लाख रुपयांचा हफ्ता पोहोचत होता, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांचा आरोप

Omkar Elephant: ओंकार हत्तीची दोडामार्गात पुन्हा एन्ट्री; बागायतींचे मोठ्या प्रमाणात केलं नुकसान, कळपात परतण्याची शक्यता

ZP Election: डिचोलीत उमेदवारांचे भवितव्य महिला मतदारांच्या हातामध्‍ये! चारही मतदारसंघात 31 हजार 723 मतदार

Smriti Mandhana: 'जास्त प्रेम करणारे...', स्मृती मंधाना लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच बोलली Watch Video

SCROLL FOR NEXT