Railway Double Tracking Dainik Gomantak
गोवा

Railway Double Tracking: तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी संमत केली असेल ‘ती’ फाईल! रेल्वे दुपदरीकरणावरून डिसोझा यांचे प्रतिपादन

Jose Philip Dsouza: रेल्वेमार्ग दुपदरी करणासाठी जमीन संपादन करण्यासाठीची फाईल महसूलमंत्री असताना माझ्याकडे आली होती, त्यावेळी मी त्यावर नेगेटीव्ह नोट लिहिला व जमीन संपादन संबंधीची परवानगी नाकारली.

Sameer Panditrao

पणजी: रेल्वेमार्ग दुपदरी करणासाठी जमीन संपादन करण्यासाठीची फाईल महसूलमंत्री असताना माझ्याकडे आली होती, त्यावेळी मी त्यावर नेगेटीव्ह नोट लिहिला व जमीन संपादन संबंधीची परवानगी नाकारली. परंतु मंत्र्यांच्यावर मुख्यमंत्री असल्याने तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी संमती दिली असेल, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जुझे फिलिप डिसोझा यांनी सांगितले.

पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी तत्‍कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामंतांचे नाव न घेता टीका केली. रेल्वे मार्ग दुपरीकरणास संमती दिल्यास रेल्वे रुळानजीक असलेल्या घरांना धोका निर्माण होईल याचा विचार करून मंत्री संमती नाकारली होती. मला हा केंद्राचा प्रकल्प असल्याचे सांगण्यात आले, परंतु मी परिणामांची चिंता केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

आम्हाला कोळशाचे प्रदुषण नको आहे, कोळशामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाले आहेत. त्यामुळे रेल्वे मार्ग दुपदरीकरणामुळे आमचा विरोध कायम असणार आहे. राज्यात अनेक ज्वलंत विषय आहेत. सध्या राज्यातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट असून याला जबाबदार सरकार आहे. या रस्त्यावर खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? सरकारने तात्काळ रस्ते सुरळीत करावेत, अशी मागणी फिलीप यांनी केली.

जि.पं.साठी पक्षाचे उमेदवार

आम्ही येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या केंद्रीय नेत्या सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी देखील आम्ही काही मतदारसंघात आमचे उमेदवार देणार आहोत. राष्ट्रवादी अजित पवार गट गोव्यात आला आहे, परंतु कार्यक्रमाच्या आयोजना व्यतिरिक्त त्यांनी काही केले नाही. स्थानिक स्तरावर त्यांचे नेते नाहीत ते येतात कार्यक्रम करतात आणि निघून जातात, असे जुझे फिलीप डिसोझा यांनी सांगितले.

जनता विरोधकांसोबत, पण...

आम्ही येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या केंद्रीय नेत्या सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी देखील आम्ही काही मतदारसंघात आमचे उमेदवार देणार आहोत. राष्ट्रवादी अजित पवार गट गोव्यात आला आहे, परंतु कार्यक्रमाच्या आयोजना व्यतिरिक्त त्यांनी काही केले नाही. स्थानिक स्तरावर त्यांचे नेते नाहीत ते येतात कार्यक्रम करतात आणि निघून जातात, असे जुझे फिलीप डिसोझा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT