कोडार खांडेपार नदी Dainik Gomantak
गोवा

Goa: बस्स...यापुढे कोडार खांडेपार नदीच्या पात्रात दुर्घटना नकोच!

कोडार - खांडेपार नदीत बुडून अपमृत्‍यू रोखण्‍यासाठी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा तालुक्यातील कोडार खांडेपार नदीच्या पात्रात बुडून मृत्युमुखी पडण्‍याच्‍या वाढत्या घटनांवर आळाबंद घालण्यासाठी फोंडा उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांनी सोमवारी सकाळी कार्यालयात विविध सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. (Joint meeting of officials was held to prevent drowning accident in Kodar-Khandepar river in Goa)

यावेळी गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टिन, लॉरना फर्नांडिस, फोंडा अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर, खाण खात्याचे उपसंचालक अभिर हेदे, फोंडा पोलिस निरीक्षक मोहन गावडे, फोंडा गटविकास अधिकारी आश्‍विन देसाई, सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता एस. वाय. गावडे, अबकारी खात्याचे अधिकारी शशिकांत नाईक यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

आळाबंद घालणार

फोंडा तालुक्यात सहलीला जाऊन मौजमजेसाठी आलेले तरुण व विद्यार्थ्यांचे कोडार खांडेपार नदीच्या पात्रात मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटना घडतात. त्‍या घटनांचे गांर्भीय लक्षात घेऊन दुर्घटना रोखण्यासाठी शासकीय यंत्रणानी पावले उचलण्यासाठी चर्चा झाली. या बैठकीत विविध खात्याच्या अधिकाऱ्यांकडून मत जाणून घेण्यात आल्या. प्रत्येकाला आपल्या सुरक्षेचा पहिला अधिकार असून बुडून होणाऱ्या घटनांवर आळाबंद घालण्यासाठी जगभरात २५ जुलै रोजी जागतिक संघटना व युनायटेड नेशनने जागृती दिवस म्हणून पाळण्याचे ठरवले असल्याचे गोवा कॅनचे समन्वयक रॉलंड मार्टिन यांनी सांगितले.

सूचनाफलक लावावेत

कोडार नदी पात्रात दुर्घटनास्थळे अधोरेखित करून इंग्रजी, मराठी, कोकणी भाषेत सूचनाफलक लावावेत. सहलीसाठी येणारे युवक मद्यपान करून अंघोळीसाठी पाण्‍यात उतरतात. मात्र, पाण्‍याचा अंदाज नसल्‍याने बुडून मृत्यू होतात. तसेच विविध खात्यात नवनवे कायदे यासंदर्भात जागृती झाली पाहिजे.

घटनास्‍थळी भेट देणार

फोंडा पोलिस निरीक्षक मोहन गावडे व फोंडा अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांनी बुडून मृत्‍यू होण्‍याच्‍या घटनांबाबत चिंता व्‍यक्त केली. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचा आढावा घेऊन काढून 19 जुलै रोजी सकाळी 10.30 वा. फोंडा उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टिन व विविध खात्याचे अधिकारी यांनी घटनास्‍थळी भेट देणार असल्‍याचे रोलंड मार्टिन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनि आणि गुरुची चाल करणार मालामाल! नव्या वर्षात खुले होणार उत्पन्नाचे नवे मार्ग, 2026 मध्ये 'या' राशींना मिळणार धनकमाईच्या सुवर्णसंधी

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT