John Nazareth Dainikl Gomantak
गोवा

जॉन नाझारेथ यांनी गोवा फॉरवर्डला दिली सोडचिठ्ठी

गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) संयुक्त सचिव जॉन नाझारेथ (John Nazareth) यांनीही गोवा फॉरवर्ड पक्षाचा राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) संयुक्त सचिव जॉन नाझारेथ (John Nazareth) यांनीही गोवा फॉरवर्ड पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपण वैयक्तिक कारणासाठी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले. 10 दिवसांपूर्वीच आपण हा राजीनामा सादर केला होता असे त्यांनी म्हटले आहे. नाझारेथ हे पूर्वाश्रमीचे सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष होते.

दरम्यान, गोवा फॉरवर्डने (Goa Forward) उत्तर गोव्यातील संपूर्ण भिस्त ज्यांच्यावर ठेवली होती त्याच पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांनी गोवा फॉरवर्डला आज रामराम ठोकल्याने गोवा फॉरवर्डला जबरदस्त धक्का बसला असून त्यामुळे उत्तर गोवा सर करण्याचे गोवा फॉरवर्डचे मनसुबे ढासळले आहेत. कांदोळकर तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

आज कांदोळकर यांनी गोवा फॉरवर्डचा राजीनामा दिला. पण त्यापूर्वी त्यांनी आपल्या या निर्णयाबद्दल गोवा फॉरवर्डच्या नेत्यांना पुर्णपणे अंधारात ठेवल्याचे कळते. यापूर्वी कांदोळकर यांनी अशाचप्रकारे भाजप पक्ष सोडून ते गोवा फॉरवर्ड पक्षात स्वतःला सामील करून घेतले होते. आपल्या निर्णयाबद्दल सांगताना कांदोळकर यांनी गोवा फॉरवर्ड काँग्रेस पक्षाबरोबर युती करत असल्यामुळे आपण गोवा फॉरवर्ड सोडल्याचे सांगितले. गोव्यात भाजपचा पराभव हे एकमेव आपले ध्येय आहे आणि काँग्रेसकडे भाजपला हरविणे शक्य होणार नाही असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT