Tuberculosis Brand Ambassador Goa Dainik Gomantak
गोवा

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Tuberculosis Brand Ambassador Goa: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे टीबी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून सामील झाल्याची माहिती दिली

Akshata Chhatre

पणजी: राज्यात क्षयरोगाचे (Tuberculosis) प्रमाण वाढत आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान 1,532 क्षय रोगाची प्रकरणे नोंदवली गेली असून याच कालावधीत 24,336 चाचण्या करूनही केवळ 99 रुग्ण बरे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि गोमंतकीय कन्या वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा हे दोन्ही कलाकार गोव्याचे टीबी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून सामील झाल्याची माहिती दिली आहे.

आरोग्यमंत्री आणि वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टनुसार वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा राज्याचे नवीन टीबी ॲम्बेसेडर म्हणून सामील झाल्याने आता क्षय रोगाविरुद्ध सामना करायला मदत मिळणार आहे.

क्षय रोगाला हद्दपार करायचं असेल तर लोकांना एकत्रित करणं महत्वाचं आहे तसेच गोवेकरांमध्ये या रोजगाबद्दल जागरूकता निर्माण होणं गरजेचं असल्याचं आरोग्यमंत्री म्हणालेत.

प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर तसेच विनोदी अभिनेते जॉन डिसिल्वा यांनी क्षयरोग जागृती मोहिमेच्‍या जाहिरातीत काम केले असून त्यांनी ‘क्षयरोगमुक्त गोवा’साठी पुढाकार घेतला आहे.

या नवीन उपक्रमामधून रोगाची लक्षणं ओळखण्यात तसेच रोगाने ग्रासलेल्या रुग्णांना मदत मिळेल आणि येणारा काळ हा गोव्यासाठी आरोग्यदायी भविष्य निर्माण करेल अशी अशा बाळगली जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT