Tuberculosis: टीबीमुक्त भारत उद्दिष्टात गोवा अजूनही मागेच; टीबी रुग्णांच्या संख्येत वाढ

Tuberculosis Cases Goa: राज्यात जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान १,५३२ क्षय रोगाची प्रकरणे नोंदवली गेली
Tuberculosis Cases Goa:  जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान १,५३२  क्षय रोगाची प्रकरणे नोंदवली गेली
Tuberculosis Cases GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Tuberculosis Cases Goa

गोवा: राज्यात वाढणारे क्षयरोगाचे (Tuberculosis) प्रमाण अद्याप आटोक्यात येताना दिसत नाही. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान १,५३२ क्षय रोगाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि याच कालावधीत २४,३३६ चाचण्या करूनही केवळ ९९ रुग्ण बरे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये.

गोव्यात पसरणारा क्षय रोगाचा हा आकडा पाहिला तर वर्ष केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २०२५ पर्यंत टीबीचं पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी ठरवलेल्या उद्दिष्टांमध्ये गोवा मागे राहील का असा प्रश्न निर्माण झालाय.

गोव्यात उसगाव आणि शिरोडा या दोन गावांना टीबी मुक्त गावांचा दर्जा देण्यात आला होता. तसेच राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दोन्ही गावांमधील सरपंचांना टीबी मुक्त गावांचे प्रमाणपत्र देखील दिले होते. मात्र राज्यातील टीबीमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या देशभरातील एकूण संख्येच्या टीबी ग्रस्त मृत रुग्णांच्या तुलनेत अधिक आहे.

Tuberculosis Cases Goa:  जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान १,५३२  क्षय रोगाची प्रकरणे नोंदवली गेली
World TB Day: 'टीबी'च्या या लक्षणांकडे कधीही करू नका दुर्लक्ष; नाहीतर भोगावे लागेल नुकसान

वर्ष २०२२ मध्ये राज्यात टीबीमुळे होणाऱ्या मृत्यू दर ८.३ टक्के होता आणि वर्ष २०२३ मध्ये हाच आकडा वाढून ९.६ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. राज्यात होणारे अधिकाधिक मृत्यू हे मद्यपान आणि टाईप-II मधुमेहामुळे झाल्याचं निदर्शनास आलंय. वर्ष २०२३ मध्ये झालेल्या २०० मृत्यूंपैकी ३० टक्के मृत्यू मधुमेहाशी संबंधित तर १८ टक्के मृत्यू मद्यपानाशी संबंधित होते.

राज्यातून टीबीचे सावट कायमचे हटवण्यासाठी क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाद्वारे रुग्णांना मोफत उपचार आणि आर्थिक मदत पुरवली जातेय. प्रत्येक टीबीच्या रुग्णाला आहारासाठी दरमाह ५०० रुपयांची मदत केली जाते. आरोग्य विभागाकडून दारूच्या अधीन झालेल्या रुग्णांवर मडगावात व्यसनमुक्तीचे उपचार केले जातायत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com