जलसंपदा विभाग (WRD) गोवा सरकारने (Government of Goa) एकूण 190 विविध मल्टी टास्किंग स्टाफ (Multi-tasking staff) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार विहित नमुन्यात अर्ज पाठवू शकतात. 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
गोवा डब्ल्यूआरडी भर्ती 2021 अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे काही विशिष्ट पात्रता असणे आवश्यक आहे ज्यात उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असून, त्याच्याकडे f मोटर वाहन/डिझेल/इलेक्ट्रिशियन/वायरमन/ऑटो आणि अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे इतर पात्र उमेदवार गोवा WRD भरती 2021अधिसूचनेसाठी अर्ज करू शकतात.
गोवा डब्ल्यूआरडी भरती 2021 नोकरीसाठी अधिसूचना तपशील:
क्रमांक 16-19/सीई-डब्ल्यूआर/डब्ल्यूसीई 66
दिनांक: 20 ऑक्टोबर, 2021.
गोवा WRD भरती 2021 साठी महत्त्वाची तारीख नोकरी अधिसूचना:
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 10 नोव्हेंबर 2021
मल्टी टास्किंग स्टाफ करीता / पदसंख्या
पंप अटेंडंट -06
असिस्टंट ऑपरेटर -17
सुपरवायझर -152
मेकॅनिक -02
वर्क असिस्टंट -10
कर्मचारी (इलेक्ट्रीशियन) -03
शैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ (पंप अटेंडंट)- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे चालवलेला उत्तीर्ण अभ्यासक्रम किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून मोटार वाहन/डिझेल/इलेक्ट्रिशियन/वायरमन/ऑटो इलेक्ट्रीशियन/वायरमनच्या संबंधित व्यापारात समकक्ष पात्रता किंवा दहावी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोकणी भाषेचे ज्ञान असणे ही आवश्यक आहे.
मल्टी टास्किंग स्टाफ (असिस्टंट ऑपरेटर) -मान्यताप्राप्त संस्थेकडून मोटार वाहन/ डिझेलच्या संबंधित क्षेत्रात ITI केलेला असावा त्याचबरोबर कोकणी भाषेचे ज्ञान असणे ही आवश्यक आहे.
मल्टी टास्किंग स्टाफ (पर्यवेक्षक)-मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेकडून उत्तीर्ण माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (10 वी इयत्ता पास).
साईटवर कामाच्या पर्यवेक्षणाचा 3 वर्षांचा अनुभव.
त्याचबरोबर कोकणी भाषेचे ज्ञान असणे ही आवश्यक आहे.
मल्टी टास्किंग स्टाफ (मेकॅनिक) -मान्यताप्राप्त संस्थेकडून मोटर वाहन/डिझेल ट्रेंड मध्ये ITI झालेला आसावा त्याचबरोबर
संबंधीत क्षेत्रात 3 वर्षांचा अनुभव आणि कोकणी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे.
असा करावा अर्ज:
इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात आणि आवश्यक तपशीलांसह भरलेल्या अर्जाच्या हार्ड कॉपीसह अर्ज करू शकतात. आणि जारी केलेल्या जागेवर सेल्फ अटेस्टेड पासपोर्ट आकाराचे फोटो देणे आवश्यक आहेत. आणि ही संपूर्ण कागदपत्रे 10/11/2021 पर्यंत मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, सिंचाई भवन, पोलीस स्टेशन जवळ, पर्वरी, गोवा या पत्तयावर पाठवून द्यावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.