Sainik School Recruitment: 10वी पास ते MBBS डिग्री धारक करू शकतात अर्ज

सैनिक शाळेत सरकारी नोकरीची अधिसूचना जारी करण्यात आली असून अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे.
Sainik School Recruitment
Sainik School RecruitmentDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील प्रतिष्ठित सरकारी सैनिक शाळेत नोकरीची (Sainik School Recruitment) संधी आहे. या भरती सैनिक स्कूल भुवनेश्वर मध्ये अनेक वेगवेगळ्या पदांसाठी केल्या जातील. या सरकारी नोकरीची अधिसूचना जारी करण्यात आली असून अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. सैनिक शाळेत किती जागा रिक्त आहेत? अर्ज कधी आणि कसा करावा? निवड प्रक्रिया काय असेल? आवश्यक पात्रता काय मागितल्या जातात? या विषयाचा संपूर्ण तपशील पुढे दिला आहे.

या पदांसाठी होणार भरती

आर्ट मास्टर - 01 पोस्ट

वॉर्ड बॉय - 05 पोस्ट

लोअर डिव्हिजन लिपिक - 01 पोस्ट

पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर - 01 पोस्ट

हॉर्स रायडिंग इन्स्ट्रक्टर - 01 पोस्ट

ब्रँड मास्टर - 01 पोस्ट

एकूण पदांची संख्या - 10

Sainik School Recruitment
IBPS PO Recruitment : पदवीधारकांना दिवाळीचं गिफ्ट, 4 हजाराहूंन अधिक जणांना नोकरीची संधी

सैनिक शाळेतील पदांसाठी किती देणार पगार

आर्ट मास्टर - वेतनश्रेणी दरमहा 35,000 रु.

वॉर्ड बॉय - वेतनश्रेणी रु. 20,000 दरमहा

लोअर डिव्हिजन लिपिक - वेतनश्रेणी 19,900 ते 63,200 रुपये दरमहा

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी - वेतनश्रेणी रुपये 40,000 प्रति महिना

हॉर्स रायडिंग इन्स्ट्रक्टर - वेतनश्रेणी 16,000 रु. दरमहा

ब्रँड मास्टर - वेतनश्रेणी 20,000 रुपये दरमहा

प्रत्येक पदाच्या पूर्ण पगारामध्ये केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर अनेक भत्ते देखील समाविष्ट असतणार आहे.

पात्रता

प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळी आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते 12 वी पास आणि संबंधित विषयातील मास्टर डिग्री व्यतिरिक्त MBBS पदवी असलेले लोक अर्ज करू शकतात. कोणत्या पदासाठी कोणत्या पात्रतेची मागणी केली गेली आहे, यासंबधीची अधिक माहिती खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तपासू शकता.

Sainik School Recruitment
Indian Railway Recruitment: 1 डिसेंबरपर्यंत करता येणार 1600 पदांसाठी अर्ज

असा करा अर्ज

सैनिक शाळेत नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागेल. Sainikschoolbhubaneswar.org या वेबसाइटवर अर्ज जावून आपण तपशील वाचून अर्ज करू शकतात. फॉर्म डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर दिलेल्या सूचनांनुसार फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे जोडा आणि पोस्ट द्वारे प्राचार्य, सैनिक शाळा, भुवनेश्वर, PO- सैनिक शाळा, जिल्हा- खुर्दा, ओडिशा- 751005 या पत्त्यावर पाठवून द्या. लक्षात ठेवा की तुमचा अर्ज फॉर्म सर्व आवश्यक कागदपत्रांसह 05 नोव्हेंबर 2021 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचायला पाहिजे.

अर्ज फी - या सरकारी नोकरीसाठी तुम्हाला डिमांड ड्राफ्टद्वारे अर्ज फी भरावी लागेल. त्यामुळे अर्जासोबत डीडी पाठवावा लागेल. एससी एसटीसाठी शुल्क 250 रुपये आहे. इतर सर्व उमेदवारांसाठी 400 रु. असणार आहे.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी सैनिक शाळेमार्फत लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर या पदांसाठी नियुक्ती केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com