ISRO Recruitment: परीक्षा न देता फक्त एका मुलाखतीत मिळवा नोकरी आणि मोठा पगार

इस्रोने कनिष्ठ संशोधन फेलो आणि संशोधन सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही (ISRO Recruitment).
ISRO Recruitment: Job opening in ISRO check for walk in interview
ISRO Recruitment: Job opening in ISRO check for walk in interview Dainik Gomantak

इस्रोने (ISRO) कनिष्ठ संशोधन फेलो आणि संशोधन सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही (ISRO Recruitment). केवळ एका मुलाखतीद्वारे, इस्रो जेआरएफ रिक्त जागा 2021 आणि संशोधन सहाय्यक रिक्ति 2021 अंतर्गत रिक्त पदे भरत आहे.हे वॉक इन इंटरव्हिव्ह आज 22 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाले आहेत . मुलाखतीची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2021 आहे. (ISRO Recruitment: Job opening in ISRO check for walk in interview)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था या रिक्त जागेसाठी अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो आणि संशोधन सहाय्यकांची एकूण 16 पदे भरणार आहे . निवडलेले उमेदवार इस्रोच्या विविध संशोधन प्रकल्पांमध्ये नोकरी करू शकतील. ही पदे तात्पुरती आहेत. परंतु यावर तुम्हाला दरमहा चांगला स्टायपेंड दिला जाणार आहे.

ISRO Recruitment: Job opening in ISRO check for walk in interview
फेक वेबसाइटचा वापर करत होऊ शकते तुमचे बँक अकाउंट रिकामे, जाणून घ्या

किती मिळेल स्टायपेंड

इस्रो जेआरएफच्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 31 हजार रुपयांचे मानधन दिले जाईल. सीनियर रिसर्च फेलो (एसआरएफ) मध्ये पदोन्नतीवर, हा स्टायपेंड दरमहा 35,000 रुपये असेल. या व्यतिरिक्त, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना वैद्यकीय लाभ म्हणजेच वैद्यकीय सुविधा देखील मिळतील. त्याचबरोबर रिसर्च असिस्टंटला दरमहा 47 हजार रुपये स्टायपेंड दिले जाणार आहे.

ISRO द्वारे IIRS डेहराडून येथे या मुलाखती घेतल्या जात आहेत. प्रत्येक 22 ते 29 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता, उमेदवाराला मुलाखतीसाठी आयआयआरएसकडे नोंदणी करावी लागणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळत आणि तुमचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यासच तुम्हाला या मुलाखतीत भाग घेता येणार आहे.

या मुलखातीला जाताना आपले आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र सोबत ठेवणे देखील अनिवार्य आहे त्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. इतर शहर किंवा राज्यातून जाणाऱ्या उमेदवारांना इस्रोकडून सर्वात कमी दुसऱ्या श्रेणीच्या रेल्वे तिकीटाचे भाडे देखील दिले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com