Jobs for international medal winners CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंना नोकरी

ऑलिम्पियाड ब्राँझ विजेती भक्ती कुलकर्णीचा विशेष सन्मान

दैनिक गोमन्तक

पणजी : आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्यांना या यापुढे शासकीय सेवेत सामावून घेण्यात येईल. शिवाय रोख पारितोषिक देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सोमवारी पणजी येथे केली. ऑलिम्पियाड पदक विजेती भक्ती कुलकर्णी हिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

(Jobs for international medal winners CM Pramod Sawant)

क्रीडा खाते आणि गोवा चेस अँड हॉक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चेन्नई येथे झालेल्या 44 व्या ऑलिम्पियाडमध्ये भारताने मिळवलेल्या महिलांच्या ब्रॉंझ पथकात गोव्याच्या भक्ती कुलकर्णीचा सहभाग होता. याबद्दल तिला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा आणि कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे उपस्थित होते. यावेळी क्रीडा खात्याचे संचालक अजय गावडे, बुद्धिबळ संघटनेचे महेश कांदोळकर, आशिष केणी, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी सरकार सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीची तयारी पूर्ण झाली असून या स्पर्धेतही गोव्याला पदक जिंकण्याची संधी आहे. यासाठीच खेळाडूंना लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

याशिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना यापुढे शासकीय सेवेत सामावून घेण्यात येईल. आणि सांघिक विजेत्या खेळाडूंना क्रीडा खात्यातील आरक्षित जागांचा उपयोग करून नोकरी देण्यात येईल. याशिवाय या खेळाडूंना रोख पारितोषिकही देण्यात येईल. ‘खेलो इंडिया’ अंतर्गत जे सेंटर उभा करण्यात येत आहेत, ती लवकरच सुरू होतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

चतुर्थीपूर्वी रक्कम देणार

कोरोनामुळे थकीत असलेली गेल्या वर्षभरातील आणि यापूर्वीची खेळाडूंसाठीची सर्व थकीत रक्कम, पारितोषिके चतुर्थीपूर्वी २९ ऑगस्टला देण्यात येतील. काही लाखो रुपयांची ही रक्कम आहे, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

राज्य सरकारने दिलेली ही भेट नक्कीच अविस्मरणीय आहे. सध्या माझे लक्ष ‘आशियाई गेम्स’वर असून नोव्हेंबरच्या दरम्यान या स्पर्धा होतील. त्यात मी देशासाठी नक्कीच पदक प्राप्त करीन.

-भक्ती कुलकर्णी, बुद्धिबळ पटू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT