Jit Arolkar Dainik Gomantak
गोवा

Jit Arolkar : मांद्रे मतदार संघातील पाण्याची समस्या सोडवली जाईल

आमदार जीत आरोलकर यांच्याहस्ते दीड लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या नवीन टाकीच्या बांधकामाचा शुभारंभ

निवृत्ती शिरोडकर

Jit Arolkar : मांद्रे मतदारसंघातील पाण्याची समस्या टप्प्याटप्प्याने सोडवली जाईल. त्यासाठी अगोदर तुये येथील 30 एमएलडी पाणी प्रकल्पाला चालना दिली जाईल, अशी ग्वाही मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली आहे. हरमल येथील पाण्याच्या नवीन टाकीच्या बांधकाम शुभारंभ आज जीत आरोलकर यांच्याहस्ते करण्यात आले.

हरमल पंचायत क्षेत्रातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी हरमल पठारावर ज्या ठिकाणी पूर्वीची जुनी पाण्याची टाकी होती. त्या बाजूला आणखी अतिरिक्त दीड लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकीच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी पेडणे सार्वजनिक बांधकाम पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, माजी पंच, पंचसदस्य तसेच मगोचे गट अध्यक्ष प्रवीण वायंगणकर उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी पाण्याची समस्या कशा प्रकारची सतावत असते याविषयी आमदार जीत आरोलकर यांच्याकडे कैफियत मांडली. आमदार जीत आरोलकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना पाणी सुरळीत करण्याविषयी महत्त्वाच्या सूचना केल्या.

आमदार जीत आरोलकर यांनी पुढे बोलताना सांगितले, मांद्रे मतदार संघातील पाण्याची समस्या आपण आमदारकीच्या काळात सोडवणार आहे. त्यासाठी नवीन पाणी प्रकल्प तुये येथे उभारण्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच या कामाचाही शुभारंभ केला जाईल. 30 एमएलडी पाणी प्रकल्प उभारल्यानंतर मांद्रे मतदारसंघात कायमची पाण्याची समस्या सुटणार असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. या प्रकल्पासाठी एकूण 24 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT