5G Network Setting in Phone  Dainik Gomantak
गोवा

Jio 5G In Goa : पणजीत आजपासून जिओची 5G सेवा सुरू

कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 1 जीबीपीएस+ वेगाने अमर्यादित डेटा

गोमन्तक डिजिटल टीम

Jio 5G In Goa : गोव्याची राजधानी पणजी शहर आज ‘जिओ ट्रू 5-जी’ नेटवर्कशी जोडले गेले आहे. याचवेळी 17 राज्यांतील 50 शहरांमध्ये एकाच दिवशी 5-जी सुरू करून जिओने एकप्रकारे विश्वविक्रम केला आहे.

यामुळे आता वापरकर्त्यांना आजपासून कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 1 जीबीपीएस+ वेगाने अमर्यादित डेटा मिळेल.

याप्रसंगी जिओच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “पणजीमध्ये जिओ ची 5-जी सेवा सादर करताना आम्हाला आनंद होत असून पणजी शहरात 5-जी सेवा सुरू करणारा जिओ ही पहिलीच कंपनी ठरली आहे.

आम्ही जिओ ट्रू 5-जी तंत्रज्ञान त्याच्या विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह पणजी आणि गोव्यातील लोकांना प्रगत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात फायदा होणार आहे."

"कृषी, शिक्षण, ई-गव्हर्नन्स, आयटी, एसएमई, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग आणि इतर अनेक क्षेत्रातही अनेक फायदे मिळतील. गोवा डिजीटल करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही गोवा सरकारचे आभारी आहोत.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT