Water Problem Dainik Gomantak
गोवा

Water Problem in Mandrem: जीत आरोलकर मतदारसंघातील समस्या सोडवण्यास अपयशी, मांद्रेमध्ये पाणी समस्या जैसे थे

मतदारसंघात मूलभूत प्रश्न सोडवण्याची जीत आरोलकर यांची मानसिकता नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Water Problem in Mandrem जनतेचे प्रश्न आणि समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी मांद्रे मधील जनतेने जीत आरोलकर यांना निवडून दिलं आहे.

मात्र असं असूनही आरोलकर लोकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यास सपशेल अपयशी ठरले आहेत असा घणाघात संजय कोळे या ग्रामस्थाने एका वृत्त वाहिनीशी बोलताना केला आहे.

मांद्रेतील रस्त्यांची दुर्दशा झालेली असून आमदार म्हणून आरोलकर कोणतीही कामे करत नसल्याचा आरोप कोळे यांनी केलाय.

पाण्याविना लोकांची दुर्दशा होत आहे. दळणवळणासाठी रस्ते नसून मतदारसंघात मूलभूत प्रश्न सोडवण्याची जीत आरोलकर यांची मानसिकता नाही. शिवोलीमध्ये एक महिला आमदार रस्ता तयार करू शकते तर आरोलकरांना कोणती अडचण आहे असा सवालही त्यांनी केलाय.

आपल्याशी प्रत्यक्ष देव बोलतो असे दिगंबर कामत सांगतात त्यामुळे मांद्रे वासियांनी एकत्र येऊन कामतांकरवी देवाला मांद्रेतील पाणी प्रश्न सुटणार की नाही हे विचारावे लागेल असा उपरोधिक टोलाही त्यांनी या वेळी लगावलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT