मांद्रे मतदारसंघाचे मगोचे उमेदवार जीत आरोलकर यांचे मोरजीत शक्तीप्रदर्शन Dainik Gomantak
गोवा

मांद्रे मतदारसंघाचे मगोचे उमेदवार जीत आरोलकर यांचे मोरजीत शक्तीप्रदर्शन

यावेळी नवीन मतदारांनी आम्ही आमचे पहिले मत जीत आरोलकर यांनाच देणार असल्याचे सांगून नवीन मतदारांनी जीतला मतदान करण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमन्तक

मोरजी: 2022 साली विधानसभेच्या निवडणुका (Goa Assembly Election) होणार आहे अजून निवडणुका (Election 2022) जाहीर झाल्या नसल्या तरी पेडणे तालुक्यातील मगोच्या (MGP) दोन्ही नेत्यांनी उमेदवारांनी प्रचाराचा नारळ ठेवून घरोघरी सुरुवात केली आहे. मागच्या चार दिवसापूर्वी पेडणेचे मगोचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी कोरगाव येथील श्री कमलेश्वर मंदिरात नारळ ठेवून शुभारंभ केला आज संकस्थ चतुर्थीचा शुभ मुहूर्त साधून मांद्रेचे मगोचे उमेदवार जीत आरोलकर (Jeet Arolkar) यांनी मोरजी येथील जेष्ठ दैवत श्री सत्पुरुष आणि मोरजाइ देवीला श्री फळ अर्पण करून प्रचाराला सुरुवात केली आहे, यावेळी जीत समर्थकांनी शक्तीप्रदर्शन घडवून आणले.

आज पर्यंतचा मांद्रे मतदार संघातून निवडून आलेल्या आमदाराला मोरजी पंचायत क्षेत्रातून मोठी आघाडी मिळाली तोच उमेदवार निवडून आलेला आहे. हीच संधी साधून मगोचे नेते जीत आरोलकर यांनी आपल्या समर्थकासोबत याच गावातून प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी मगोचे केंद्रीय समितीचे सदस्य राघोबा गावडे, माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई, पंच गुणाजी ठाकूर, पंच प्रवीण वायगणकर, माजी सरपंच अश्वेता मांद्रेकर, माजी पंच उदय मांद्रेकर, पंच महादेव हरमलकर, माजी सरपंच सेरेफिना फर्नांडीस, दयानंद मांद्रेकर, वंदना शेटगावकर, नाना उर्फ नारायण सोपटे केरकर लक्ष्मिच्यारी, व नवीन मतदार मोठ्या संखेने उपस्थित होते.

यावेळी नवीन मतदारांनी आम्ही आमचे पहिले मत जीत आरोलकर यांनाच देणार असल्याचे सांगून नवीन मतदारांनी जीतला मतदान करण्याचे आवाहन केले. जीत आरोलकर सारखा नेता विकास करू शकतो असे सांगितले. पार्से येथील वयोवृद्ध महिला लक्ष्मि च्यारी यांनी मनोगत व्यक्त करताना जीत आरोलकर हे आमदार नसतानाही पार्से येथे लोकांच्या आग्रहासाठी मठ बांधून दिला आणि ते आमदार झाल्यानंतर बराच विकास करू शकतात असे च्यारी म्हणाल्या.

भाजपला पाठिंबाच नाही; जीत आरोलकर

जीत आरोलकर यांनी पत्रकारांकडे बोलताना आपण कादापही भाजपा सरकारला निवडून आलो तरी पाठींबा देणार नाही, मान्द्रेवासियाना बदल हवा आहे आणि त्याची सुरुवात मोरजीतील मतदारापासून सुरुवात होणार असल्याचे सांगून विकासाची बाता मारणाऱ्या आमदाराने आजपर्यंत युवकासाठी काय केले असा सवाल करून बेरोजगारी हटवण्यासाठी आपण या मतदार संघात एखादा प्रदूषणमुक्त प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

20 वर्षानंतर पुन्हा मगोचा आमदार ; राघोबा गावडे

मगोचे केंद्रीय समितीचे सदस्य राघोबा गावडे यांनी बोलताना पुन्हा एकदा मांद्रे मतदार संघातून मगो पक्षाचा आमदार वीस वर्षानंतर निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. देवेंद्र प्रभुदेसाई यांनी बोलताना मोठ्या आशेने मतदारांनी आमदार दयानंद सोपटे यांनी विजयी केले होते , त्यांनी स्वार्थासाठी आमदारकी विकली आणि पुन्हा भाजपा कळपात शिरले आता मंद्रेत परिवर्तन करून नवा इतिहास रचुया असे देवेंद्र प्रभुदेसाई म्हणाले. त्याचबरोबर उदय मांद्रेकर , वंदना शेटगावकर,आदींनी मनोगत व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT