Dudhsagar Waterfall Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Waterfall: दूधसागर पर्यटन वेबसाईट आम्हाला परत द्या! जीटीडीसीचा हस्तक्षेप नको

Dudhsagar Waterfall: कुळेत दूधसागर जीप टूर ऑपरेटर्सनी खासदार विरियातो फर्नांडिस यांची भेट घेतली व आपली समस्या त्यांच्याकडे मांडली

गोमन्तक डिजिटल टीम

Dudhsagar Waterfall Update

कुळे: कुळेत दूधसागर जीप टूर ऑपरेटर्सनी खासदार विरियातो फर्नांडिस यांची भेट घेतली व आपली समस्या त्यांच्याकडे मांडली. यावेळी फर्नांडिस यांनी आपण ही समस्या सोडविणार असल्याचे आश्‍वासन दिले. ते म्हणाले, आपला हक्क मागण्यासाठी कुणालाही घाबरण्याचे कारण नाही. दूधसागर पर्यटन व्यवसाय हा येथील स्थानिकांचा व्यवसाय आहे. याबाबत आपण लोकसभेत प्रश्‍न मांडणार आहे.

दूधसागर धबधबा पर्यटन व्यवसायाची वेबसाईट आहे, ती आमची वेबसाईट आम्हांला परत द्यावी. या ठिकाणी जीटीडीसीचा हस्तक्षेप नको. सरकारला जो काही कर आहे, तो आम्ही भरण्यास तयार आहे, असे जीप टूर ऑपरेटर्सनी सांगितले. आम्हांला जिटीडीसीचा हस्तक्षेप नको, आम्हांला आपण सहकार्य करावे, अशी मागणी अध्यक्ष नीलेश वेळीप व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

येथील ट्रेकर्स म्हणाले, सकाळी ८ ते १० या वेळेत पर्यटकांना अभयारण्यात प्रवेशाची वेळ असते, ती वेळ अत्यंत चुकीचा असून मोठ्या संख्येने रेलगाडीने येणाऱ्या पर्यटकांसाठी ही वेळ बरोबर नाही. कुळे गावात सकाळी १० च्या नंतर अनेक पर्यटक येतात, प्रवेश बंद झाल्याने त्यांना माघारी फिरावे लागते. तेव्हा वन खात्याने सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत पर्यटकांना अभयारण्यात प्रवेश द्यावी, अशी मागणी येथील ट्रेकर्सनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

Goa Third District: नवा तिसरा जिल्हा आणि मुख्यालय; काब्राल यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार का मानले? काँग्रेस आमदाराचा सवाल

Operation Sindoor: 'सैनिकांच्या शौर्यासाठी टाळ्या वाजवण्यास नकार..? राहुल गांधींवर उठली टीकेची झोड; संरक्षणमंत्र्यांच्या आवाहनानंतर नवा वाद

SCROLL FOR NEXT