Dudhsagar Waterfall: ‘दूधसागर’साठी आता ‘ऑनलाईन’ बुकींग! गाईड्सचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन

Dudhsagar Waterfall Entry Fee: वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा तथा आमदार दिव्या राणे यांच्‍या हस्‍ते त्‍याचे अनावरण झाले
Dudhsagar Waterfall Entry Fee: वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा तथा आमदार दिव्या राणे यांच्‍या हस्‍ते त्‍याचे अनावरण झाले
Dudhsagar WaterfallDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कुळे: ‘दूधसागर’वर मॉन्सून ट्रेकिंग करायचे असल्‍यास अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन बुकिंग करावे लागणार आहे. वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा तथा आमदार दिव्या राणे यांच्‍या हस्‍ते त्‍याचे अनावरण झाले.

गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने ट्रेकिंग सुरू करण्यात आले असून, त्यासाठी विभागाने मार्गदर्शकांना प्रशिक्षण देखील दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार गणेश गावकर उपस्थित होते.

गावकर म्‍हणाले, दूधसागर ट्रेकिंगसाठी ५०० रुपये व जीएसटी भरावा लागेल. एक मार्गदर्शक १० पर्यटकांना ट्रेकिंगसाठी घेऊन जाऊ शकतो. नेटवर्क समस्या येऊ शकते म्हणून ट्रेकिंग बुक करण्यासाठी ‘ऑफलाईन’ पर्याय देखील आहे.

Dudhsagar Waterfall Entry Fee: वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा तथा आमदार दिव्या राणे यांच्‍या हस्‍ते त्‍याचे अनावरण झाले
Dudhsagar Waterfall: दुसऱ्या दिवशीही दूधसागर गाईड्सचे आंदोलन सुरूच; अजून मागण्‍यांची दखल नाहीच

तिसऱ्या दिवशीही गाईड्‌सचे आंदोलन

‘आमचे कुणी ऐका हो! आमच्या समस्या जाणून घ्या’, अशी हाक देत कुळे-दूधसागर धबधबा ठिकाणी आंदोलन करणाऱ्या ट्रेकर्स गाईड्सनी तिसऱ्या दिवशीही आंदोलन केले. आम्‍हाला साधे कुणी भेटायलाही आले नाही, असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Jerson Gomes Attack Latest News
House Of Abhinandan Mega project Goa
Goa Environmental Movements
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com