Guirim water pipeline, JCB accident Goa, Goa pipeline burst Dainik Gomantak
गोवा

Guirim: कचरा हटवताना फुटली जलवाहिनी, हजारो लिटर पाण्याची नासाडी; JCB सह कामगारांचा घटनास्थळावरून पोबारा

Goa Guirim Water Pipe Burst: : जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यालगत पडलेला कचरा हटवताना गिरी येथे राष्ट्रीय महामार्गशेजारील मुख्य जलवाहिनी फोडण्याचा प्रकार घडला. परिणामी, हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली.

Sameer Panditrao

म्हापसा: जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यालगत पडलेला कचरा हटवताना गिरी येथे राष्ट्रीय महामार्गशेजारील मुख्य जलवाहिनी फोडण्याचा प्रकार घडला. परिणामी, हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली.

ही घटना मंगळवार (ता.८), दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. ग्रीन पार्क जंक्शन पासून काही अंतरावर सेवा रस्त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला होता. हा कचरा संबंधितांकडून जेसीबीच्या सहाय्याने साफ केला जात होता.

यावेळी जेसीबी चालकाला या कचऱ्याखाली जलवाहिनी असल्याचा अंदाज न आल्याने ती फुटली. जलवाहिनी फुटताच जेसीबीसह कामगारांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही जलवाहिनी १ हजार मि.मी. व्यासाची असल्याने ती फुटल्याने पाण्याच्या प्रचंड दाबामुळे पाण्याचे उंच फवारे उडू लागले. परिणामी, सेवा रस्ता तसेच महामार्गावर पाणी पडू लागल्याने या मार्गावरुन जाणाऱ्या दुचाकीस्वारांना तसेच वाहनचालकांना त्राससोसावा लागला.

‘अस्नोडा’तून पाणीपुरवठा खंडित

या घटनेची माहिती मिळताच पाणी पुरवठा खात्याचे सहाय्यक अभियंता रोहिदास नाईक व कनिष्ठ अभियंता प्रज्योत नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच अस्नोडा प्रकल्पातील अधिकाऱ्यांमार्फत जलवाहिनीतील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला.शिवाय या जलवाहिनीचे दुरूस्ती काम सांयकाळी कंत्राटदाराच्या मार्फत हाती घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जलवाहिनी दुरूस्त होण्याची शक्यता असून त्यानंतर बार्देश तालुक्यातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दिल्ली ते गल्लीतील गुन्हेगारांचे 'गोवा' आश्रयस्थान बनू नये..

Goa Accidental Deaths: गोव्यात वर्षाकाठी 300 हून अधिक लोकांचे रस्ते अपघातांत बळी! ही परिस्थिती कधी बदलणार?

Shubhanshu Shukla: अंतराळवीर 'शुभांशू शुक्ला' पृथ्वीवर परतणार! हार्मनी मोड्यूलमधून प्रवास होणार सुरु

Ram Temple Film: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

SCROLL FOR NEXT