Guirim News: गिरी पंचायतीसमोरील मुख्य रस्ता पाण्याखाली; प्रवास बनला धोकादायक

अपघाताची भीती; वाहनधारकांना करावी लागतेय कसरत
Guirim Road Near Panchayat Submerged Underwater:
Guirim Road Near Panchayat Submerged Underwater: Dainik Gomantak
Published on
Updated on

Guirim Road Near Panchayat Submerged Underwater: उत्तर गोव्यातील गिरी येथे पंचायतीसमोरील मुख्य रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अतिवृष्टीमुळे या भागात पाणी साचले आहे. या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातूनच वाहनधारकांना वाहने चालवावी लागतात.

पादचाऱ्यांसह वाहनचालकांना या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत आहे. यावर लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Guirim Road Near Panchayat Submerged Underwater:
Goa Rajyasabha Poll: गोव्यातील राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

दरम्यान, अनेक दुचाकीस्वार रस्त्यावरील पाण्यातून वाहने चालवण्यापेक्षा रस्त्याशेजारील फुटपाथच्या भागातून दुचाकी नेतात. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साचल्याने रहिवाशांना आणि प्रवाशांना मोठा त्रास झाला आहे. ज्यामुळे सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून लोकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे. सध्या पादचारी आणि वाहनचालक या भागात सुरक्षितपणे जाऊ शकत नाहीत. प्रवाशांना पर्यायी मार्ग शोधणे भाग पडत आहे. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात आहे.

याबाबत पंचायतीसह अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. बाधित भागातील रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचा आणि परिस्थिती सुधारेपर्यंत अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com