Guirim: गिरीत भूमिगत वीजवाहिनीच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली; पाणीपुरवठा विभागाने तातडीने केली दुरुस्ती

Water Supply Restored After Damage: सध्या गिरीत भूमिगत वीजवाहिनी टाकण्यासाठी कंत्राटदारामार्फत खोदकाम सुरू आहे.
Guirim Water Supply Restored After Damage
Water Supply Restored After DamageDainik Gomantak
Published on
Updated on

Guirim Water Pipeline Burst During Excavation Repaired Immediately

म्हापसा: मोंते, गिरी येथे भुयारी मार्गाजवळील सर्व्हिस रस्त्यावर भूमिगत वीजवाहिनी टाकण्याच्या खोदकामावेळी जलवाहिनी फोडण्यात आल्याने पाणी पुरवठ्यात व्यत्यय आला. तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला. 500 एमएमची आसाची ही जलवाहिनी पाणी पुरवठा विभागाने रविवारी (2 मार्च) दुरुस्त केली.

वीजवाहिनी टाकण्यासाठी गिरीत खोदकाम सुरु

सध्या गिरीत भूमिगत वीजवाहिनी टाकण्यासाठी कंत्राटदारामार्फत खोदकाम सुरू आहे. १ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास या कामावेळी मोंते गिरी येथील जलवाहिनीला धक्का लागून ती फुटली. फुटलेल्या या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्ग व आजूबाजूच्या परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. मोंते गिरी बाजूने जाणारा रस्ता पाण्यात बुडाला होता.

Guirim Water Supply Restored After Damage
Guirim Accident: गिरी येथे भरधाव कार माडाला धडकली, कारचालकाचा मृत्यू

वाहतुकीला अडथळा

यामुळे वाहन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. याची माहिती मिळाल्यानंतर पाणी पुरवठा विभागाने गिरी ते साळगाव, पर्वरी व कळंगुट दरम्यान जाणाऱ्या जलवाहिन्यांचे पाणी पुरवठा खंडित केला. रविवारी सकाळी पाणीपुरवठा विभागाने फुटलेल्या वाहिनीचे कंत्राटदारामार्फत दुरुस्तीचे काम हाती घेतले व दुपारी तीनपर्यंत ही जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली. त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला.

शेतातील माती वाहून गेली

फुटलेल्या जलवाहिनीच्या पाण्यामुळे शेतातील माती मोठ्याप्रमाणात वाहून गेली. हा प्रकार शेत मालकाच्या निदर्शनास येताच त्यांनी वीज व पाणी पुरवठा अधिकारी आणि कंत्राटदाराला जाब विचारीत जलवाहिनी दुरुस्तीचे काम रोखून धरले. वीज खात्याच्या अधिकाऱ्यांकडे वाटाघाटी झाल्यावर जवळपास अडीच तासांनी जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ववत सुरू करण्यात आले. दरम्यान, शेतजमिनीत मातीचा भराव घातला.

Guirim Water Supply Restored After Damage
Guirim Mapusa Crime Case: लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय युवतीवर बलात्कार, गिरीच्या सरपंचावर गुन्हा

स्थानिकांची गैरसोय झाली

जलवाहिनी फुटल्यामुळे संपूर्ण गिरी तसेच साळगाव व सांगोल्डा पंचायत क्षेत्रातील काही भागातील लोकांना शनिवारी रात्री तसेच रविवारी सांयकाळी उशिरापर्यंत पाणी मिळाले नाही. पाण्याअभावी या लोकांची गैरसोय झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com