Jayesh Salgaonkar Dainik Gomantak
गोवा

जयेश साळगावकरांनी भाजपमध्ये केला प्रवेश !

आमदारकीचा राजीनामा सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांच्याकडे सादर केला आहे. तर आज त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला.

दैनिक गोमन्तक

गोवा फॉरवर्ड पक्षाचे (Goa Forward Party) आमदार जयेश साळगावकर (Jayesh Salgaonkar) यांनी पक्षाला रामराम ठोकत आपल्या आमदारकीचा राजीनामा सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांच्याकडे सादर केला होता. तर आज अखेर साळगावकरांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant), गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, नवी दिल्लीला (Delhi) आमच्या बरोबर येण्यासाठी आम्ही जयेश साळगावकर (Jayesh Salgaonkar) यांना विमानाचे तिकीटही पाठविले होते मात्र आपले कुणीतरी वारले आहे असे सांगून त्यांनी दिल्लीला येण्याचे टाळले. त्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्कच तोडला असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी स्पष्ट करत त्यासाठीच आम्ही त्याला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे अशी माहिती दिली. गोवा फॉरवर्डचे साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेऊन कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

Goa Assembly Live: तिसरा जिल्हा; मुख्यालयावरून आल्टन आक्रमक

IND vs ENG: मँचेस्टर कसोटी अनिर्णित, पण टीम इंडियाच्या नावावर लज्जास्पद विक्रम; 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

Goa Monsoon Vegetables: चिप्स, बर्गर, पिझ्झा नको! गोव्यातील विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळी रानभाज्यांचा आस्वाद

"गोयेंचो ताजमहाल सेंचुरी करता" कला अकादमीला आणखीन 20 कोटींचा खर्च; अधिवेशनापूर्वीच विजय सरदेसाईंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT