Statistics of last 7 years of cases registered under sedition law Dainik Gomantak
गोवा

Jayesh Chodankar Case: चोडणकर खूनप्रकरणी सुनावणी 7 पर्यंत तहकूब

चिंबल येथील जयेश चोडणकर याच्या खूनप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे

दैनिक गोमन्तक

Jayesh Chodankar Case: चिंबल येथील जयेश चोडणकर याच्या खूनप्रकरणी संशयित प्रीतेश अडकोणकर व आयआरबी पोलिस कृपेश वळवईकर या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केलेल्या अर्जावरील सुनावणी पुढील सोमवारपर्यंत (७ ऑगस्ट) तहकूब करण्यात आली.

संशयितांनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्यांनी तो पूर्वनियोजितपणे केला आहे. त्यांना जामीन दिला जाऊ नये अशी विनंती जुने गोवे पोलिसांनी केली आहे.

संशयितांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने व अनेक साक्षीदारांच्या जबान्या नोंदवायच्या आहेत. त्यांना जामिनावर सोडल्यास ते साक्षीदारांना धमकावून तपासकामात अडथळा आणण्याची अधिक शक्यता आहे.

जयेश चोडणकर याला संशयितांनी बोलावून चिंबल येथील वाहन पार्किंगसंदर्भातच्या जागेवर तोडगा काढू, असे सांगितले होते. जयेश हा त्यांना भेटण्यास आला असता प्रीतेश अडकोणकर व कृपेश वळवईकर या दोघांनी त्याच्या डोक्यावर तसेच शरीरावर लोखंडी रॉडने मारहाण केली.

तो बेशुद्ध पडल्यावर त्याला चिंबल येथून मेरशी जंक्शनवर आणून टाकण्यात आले. त्याचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाल्याचे दाखवण्याचा संशयितानी प्रयत्न केला. मात्र हा सर्व प्रकार पाहणारे साक्षीदार आहेत.

जामिनाला विरोध!

शव चिकित्सा अहवालात जयेश चोडणकर याचा मृत्यू त्याच्या पायावरून वाहन गेल्याने नव्हे, तर त्याच्या डोक्यावर जोरदार जड वस्तूने प्रहार झाल्याने झाल्याचे नमूद केले आहे. संशयितांनी यापूर्वीही जयेश चोडणकर याला धमकी दिली होती, त्यामुळे त्यांच्यात अनेक महिन्यांपासून पूर्ववैमनस्य होते, असे नमूद करून जामिनाला पोलिसांनी विरोध केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

SCROLL FOR NEXT