जनमन उत्सव Dainik Gomantak
गोवा

जनमन उत्सव: महिलांमध्ये आरोग्य जागृती हवी

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात महिलांसाठी पोषक वातावरण आहे

दैनिक गोमन्तक

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात महिलांसाठी पोषक वातावरण आहे. याचे प्रमुख कारण गोव्यात महिला शिक्षण, सामाजिक क्षेत्रात पुढारलेल्या आहेत. तरी सुद्धा गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने काही प्रमाणात महिलांसाठी भीतीदायक परिस्थिती उद्‍भवते. सरकारने शासकीय व प्रशासकीय पातळीवर महिलांना मदत केली पाहिजे. त्या साठी कायदा करणे आवश्यक आहे व सरकारने महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना उत्पन्न केली पाहिजे. हिने या प्रतिनिधिशी बोलताना आपले मत व्यक्त केले.

गोव्यात महिला प्रगतशील निश्र्चितच आहे तरी अजूनही मोठ्या प्रमाणात सुधारणा होणे आवश्यक आहे. गोव्यात महिला सर्वच क्षेत्रात काम करताना दिसतात. मात्र नेतृत्वाच्या नजरेने पाहिले तर अजून महिला मागे आहेत. सरकारी कचेऱ्यांमध्ये किंवा राजकारणात त्या मानाने महिलांची संख्या कमी वाटते. सरकारमध्ये किती महिला खात्याच्या प्रमुखपदी आहेत? अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रातही गोव्यात महिला पुढेच आहेत. मात्र महिलांना गोव्यातील पारंपरिक संस्कृतीमुळे मोठी झेप घेताना विचार करावा लागतो. त्यांना संधी असूनही त्याचा लाभ घेता येत नाही. महिलांची प्रगती झाली तरी कौटुंबिक जबाबदारी शेवटी महिलांनीच घ्यावी असा जो समज आहे, त्यामुळे नेतृत्व करण्याच्या संधीपासून महिला अलिप्त राहतात.

गोव्यात अनेक पारंपरिक व्यवसाय आहेत. उदाहरणार्थ कुंभारकाम, कृषी, शेती, मासेमारी, फुलविक्री, चितारी, ज्यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. या व्यवसायासाठी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठीही सरकारने पुढाकार घ्यावा.

शासनाने महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. महिलांना लैंगिक शिक्षणाची गरज आहे. मासिक पाळी संबंधाने जो गैरसमज आहे तो नाहीसा करण्यासाठी सरकारनेच तशी कायद्यात तरतूद करावी. सरकारला ते शक्य आहे. याचे कारण गोवा लहान राज्य आहे व सरकारने या दृष्टीने पावले उचचली तर इतर राज्यांसाठी गोवा आदर्श राज्य ठरू शकते व त्याद्वारे उत्क्रांती, विकास होऊ शकेल.

अन्वेषा सिंगबाळ, अध्यक्ष, कोकणी भाषा मंडळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

West Nile Virus: वेस्ट नाईल व्हायरसने जगभरात वाढवली चिंता! लहान मुलांना सर्वाधिक धोका; जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

Goa Fish Export:"सद्या श्रावण सुरु आसा, हांवूंय नुस्ते खायना" मासे निर्यातीवरून LOP आलेमाव आणि CM सावंतमध्ये रंगला कोकणी संवाद; Watch Video

Goa Assembly Live: सनबर्नला गोव्यात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार मायकल लोबो यांचे विधानसभेत आश्वासन

Viral Video: 'मी झाडांची महाराणी...!' झाडाच्या फांदीवर बसलेल्या महिलेची 'अजब' रील व्हायरल; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

SCROLL FOR NEXT