जनमन उत्सव Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीय महिलांच्या स्वप्नातील गोवा साकार करण्यासाठी ‘जनमन उत्सव’

संपूर्ण गोवा राज्यात हे सर्वेक्षण करण्यात येत असून सर्वच ठिकाणी सर्वेक्षणाला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोमंतकीय महिलांच्या आशा-आकांशा आणि समस्या जाणून घेऊन त्यांच्या स्वप्नातील गोवा साकार करण्यासाठी दै. ‘गोमन्तक’ने राज्यभरात ‘जनमन उत्सव’ हा सर्वेक्षण उपक्रम हाती घेतला आहे. आज हे सर्वेक्षण फातर्पा आणि नावेली येथील हाऊसिंग बॉर्ड भागात करण्यात आले. महिलांनी या सर्वेक्षणात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली मते व्यक्त केली.

संपूर्ण राज्यात हे सर्वेक्षण करण्यात येत असून सर्वच ठिकाणी सर्वेक्षणाला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज नावेली येथील हाऊसिंग बोर्ड आणि फातर्पा येथे झालेल्या सर्वेक्षणाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापूर्वी बेतूल येथील कपेलवाडा आणि ताकवाडा भागात जाऊन महिलांची मते घेण्यात आली. सासष्टी तालुक्याबरोबर केपे, सांगे या भागांतही महिलांकडून योग्य प्रतिसाद मिळत आहे.

‘गोमन्तक’च्या या सर्वेक्षणाला शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून तीन लाख महिलांपर्यंत पोहचून त्यांच्या स्वप्नातील गोवा कसा असावा हे जाणून घेण्‍यात येणार आहे. मडगाव, फातोर्डा, दाबोळी, काणकोण या मतदारसंघांतील ‘गोमन्‍तक’चे जनमन उत्सव सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर आता केपे मतदारसंघात हे सर्वेक्षण सुरू झाले आहे. किटला-फातर्पा येथील महिलांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

मागचे दोन दिवस फातर्पा भागात हे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणातून महिलांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याबरोबरच त्यांच्या आकांक्षाना नवीन माध्यम मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नावेली मतदारसंघातही मिलिट्री कॅम्प, घाटमरड, गोपाळ शेणवी हायस्कूल परिसर येथील महिलांनी या सर्वेक्षणात सहभाग घेऊन आपली मते नोंदविली. मुरगाव मतदारसंघात सडा भागात मशीद परिसर, साईबाबा मंदिर परिसर, सरकारी हायस्कूल परिसर येथे हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून गोव्यातील तीन लाख महिलांपर्यंत ‘गोमन्‍तक’ पोचणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT