Marago Vijai Sardesai Janata Darbar  Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: सरदेसाईंच्या ‘जनता दरबार’ला लोकांचा प्रचंड प्रतिसाद

Margao News: शेकडो लोकांनी मांडल्‍या आपल्‍या समस्‍या

गोमन्तक डिजिटल टीम

माजी मुख्‍यमंत्री आणि भाजप नेते दिगंबर कामत यांच्‍या बालेकिल्‍ल्‍यात म्‍हणजेच मडगावात आज गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी घेतलेल्‍या ‘जनता दरबार’ला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्‍यांनी सांगितले की, मडगाव कोसळत चालले आहे. सर्व मडगावकरांनी एकत्र येऊन ते सांभाळण्याची गरज आहे.

सरदेसाई यांच्या या ‘जनता दरबार’ला २००हून अधिक लोकांची उपस्‍थिती होती. मडगावसह सासष्टीतील विविध भागांतील लोकांनी प्रश्‍‍न मांडले. चढाओढीच्‍या राजकारणात सरदेसाई यांनी टाकलेले हे पाऊल आमदार दिगंबर कामत यांची चिंता वाढविणारे ठरणार आहे.

दरम्‍यान, लोकांनी जमीन बळकाव प्रकरण, पर्यटन कायदा, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आदी विषय मांडले. काँग्रेस नेते सावियो कुतिन्हो, भाजपला सोडचिठ्ठी दिलेले माजी नगरसेवक केतन कुरतरकर, अपक्ष नगरसेवक घनश्याम शिरोडकर उपस्‍थित होते.

विजय सरदेसाई, आमदार

‘जनता दरबार’मध्‍ये लोकांनी ज्‍या समस्या मांडल्या, त्यांचा अभ्यास करून येत्‍या विधानसभा अधिवेशनात आपण यासंदर्भात प्रश्‍‍न विचारणार आहे. यापुढे दर आठवड्याला पालिकेत येऊन लोकांच्या समस्या ऐकून घेणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betalbatim Beach: आधी जीवरक्षकाशी वाद घातला, पण त्याच 'जीवरक्षका'ने वाचवला जीव; बेताळभाटी किनाऱ्यावर पर्यटकाची बेफिकिरी!

Viral Video: रील्ससाठी तरुणाईची अजब क्रेझ! म्हशीच्या पाठीवर उभ राहून पोरीचा डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवासाठी '14 ऑगस्ट' खास! आजच्याच दिवशी ठोकलं होतं पहिलं कसोटी शतक; 35 वर्षांनंतरही 'त्या' रेकॉर्डची आठवण कायम

Kishtwar Cloud Burst: 33 मृत्यू, 200 हून अधिकजण बेपत्ता! ढगफुटीने किश्तवाडमध्ये हाहाकार, बचावकार्य सुरु; PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

SCROLL FOR NEXT