Salcete News Dainik G
गोवा

Salcete News: गुलालोत्सवासाठी जांबावलीवासीय सज्ज

कडक पोलिस बंदोबस्त : हजारो भाविक करणार श्री दामबाबावर गुलालाची उधळण; बुधवारी सांगता

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात प्रसिद्ध असलेला जांबावलीचा श्री दामबाबाचा गुलालोत्सव मंगळवार, 14 रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा शिगमोत्सवाचा प्रमुख व महत्त्वाचा दिवस असून दुपारी 3.30 वाजता श्री रामनाथ देव मंदिराच्या प्रांगणात गुलालोत्सवाला सुरवात होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

जांबावलीच्या शिगमोत्सवाला बुधवारपासून सुरवात झाली व गेले सहा दिवस अनेक धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रम हाजारो भक्तांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले. या गुलालोत्सवाला हजारोच्या संख्येने भाविक हजर राहणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी आयोजक मठग्रामस्थ हिंदू सभेने सर्व तयारी केली आहे.

गुलालोत्सवानंतर रात्री 11 वाजता नवरदेवाची वरात कार्यक्रम व 12 वाजता संगीत सभा होणार आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता होणाऱ्या धूळपेटीने उत्सवाची सांगता होणार आहे. आज (ता.14) जांबावली व परिसरात शेकडो पोलिस तैनात केले जातील.

केपे पोलिस ठाण्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सर्व उपाययोजना आखली आहे. त्यानुसार पार्किंगसाठी जागाही निश्‍चित केल्या आहेत. या जागांवरच पार्किंग करून वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी लोकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याची आवश्‍यकता आहे.

आज जांबावलीत पोलिस आउटपोस्ट सुरू करण्यात आले. उद्या येथे केपेसह कुंकळ्ळी, कुडचडे, मडगाव येथील पोलिस कुमक बोलावण्यात आली आहे. या सर्वांना वाहने पार्क करण्यासाठी उपलब्ध केलेल्या जागांवर व प्रमुख रस्त्यांवर ठेवण्यात येणार आहे. उद्या सकाळपासूनच भाविकांची जांबावलीला गर्दी होईल, असा अंदाज आहे.

पार्किंगसाठी जागेची उपलब्धता

श्री दामोदराच्या मंदिराबाहेर दुकाने थाटली जात ती आता जरा दूर ठिकाणी हलविण्यात आली आहेत. त्यामुळे वाहने पार्क करण्यासाठी व गुलालोत्सवासाठी पुरेशी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. पाकिटमार व इतर वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर कडी नजर ठेवण्यासाठी खास पोलिस तैनात करण्यात आले आहेत. अनुचित घटना घडू नये म्हणूनही पोलिस तत्पर राहणार आहेत.

पहाटे श्री दामोदराची पालखी श्री रामनाथ मंदिराच्या प्रांगणात आणून ठेवली जाईल व दुपारी गुलालोत्सवानंतर परत आपल्या मंदिरात निघणार आहे. लोकांनी श्री दामोदर दैवतावर गुलाल उधळल्याशिवाय भक्तांनी गुलालोत्सवाला आरंभ करू नये व शिस्तीने श्रींचे दर्शन घ्यावे. तसेच भेसळयुक्त गुलालाचा वापर न करता शुद्ध गुलालच वापरावा, असे आवाहन करतो.

- पांडुरंग ऊर्फ भाई नायक,

अध्यक्ष, मठग्रामस्थ हिंदू सभा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Captaincy: "आम्हाला युवा खेळाडूंना संधी द्यायचीय", रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढलं? अजित आगरकरांनी सांगितलं खरं कारण

Goa Politics: "हे दोघेही गोव्याच्या लोकांना मूर्ख बनवतायत", अरविंद केजरीवालांचा पाटकर- CM सावंतांवर हल्लाबोल

रश्मीका-विजयने गुपचूप उरकला साखरपूडा; दोन महिन्यात होणार 'शुभमंगल सावधान'!

Rishabh Pant: 100 कोटींचा 'मालक'! दिल्लीत 2 कोटींचे आलिशान घर, 4 शहरांत प्रॉपर्टी... ऋषभ पंतची Net Worth ऐकून चक्रावून जाल

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'नवा फॉर्म्युला'! RGPने उघडले युतीचे दरवाजे; गोव्याच्या राजकारणात मोठा बदल?

SCROLL FOR NEXT