ST Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: भाजपानेच केला एसटी राजकीय आरक्षणाचा घोळ; ‘उटा’चे नेते बांधले दावणीला

सडेतोड नायक : एसटी समाजाशी कधीही प्रतारणा नाही; धाकू मडकईकर यांची ग्वाही

गोमन्तक डिजिटल टीम

ST Reservation भाजपाने गोव्यात सत्तेवर येण्यासाठी ‘उटा’ आंदोलनाचा वापर केला आणि सत्तेवर आल्यानंतर ही संघटना निष्प्रभ होईल हे पाहिले, असा आरोप ‘सडेतोड नायक’ या गोमन्तक टीव्हीच्या कार्यक्रमात 24 रोजी करण्यात आला.

भाजप एसटी विभागाचे उपाध्यक्ष धाकू मडकईकर, ‘गाकुवेध’चे संस्थापक गोविंद शिरोडकर आणि रवींद्र वेळीप या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शिरोडकर म्हणाले, ‘सत्तेवर आलेल्या काँग्रेस पक्षाला अपशकून करण्यासाठी ‘उटा’ आंदोलनाचा भाजप नेत्यांनी वापर केला.

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते या आंदोलनामागे होते. ‘उटा’ संघटनेचे जे नेते सत्तेवर आले, त्यांनाही समाजाच्या मागण्यांचे नंतर सोयरसुतक राहिले नाही.’

भाजपात असलेल्या समाजाच्या दोन नेत्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, असाही आरोप शिरोडकर यांनी केला; परंतु त्यांनी या नेत्यांची नावे घेतली नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर एसटी आरक्षणासंदर्भातील फाईल गेले तीन महिने पडून आहे.

‘उटा’तर्फे केंद्रीय न्याय व कायदा मंत्रालयाला एसटी आरक्षणासंदर्भातील आम्ही एक पत्र लिहिले होते. त्यावेळी मंत्रालयाने राज्य सरकारकडे ही परिस्थिती का उद्‍भवली, अशी विचारणा केली होती. परंतु सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाणिवपूर्वक हे पत्र दडपून ठेवले, असाही आरोप करण्यात आला.

रवींद्र वेळीप यांनी धाकू मडकईकरवर व सुदेश केपेकर यांच्यावर आरोप करताना संघटनेने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा घेतलेला निर्णय त्यांनी भाजपच्या दबावाखाली मागे घेतल्याचे मत मांडले.

\भाजपात आपल्याला स्थान असल्याने व मुख्यमंत्र्यांनी 2027 पूर्वी आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन विधानसभेत दिले असल्याने संघटनेने केलेल्या ठरावाला आपले अनुमोदन असणे योग्य होणार नाही, हे भाजप पक्षाध्यक्षांनी आपल्या निदर्शनास आणून दिले.

त्यामुळे आपल्याला आरक्षणासंदर्भात तशी भूमिका घ्यावी लागली, हे मडकईकर यांनी स्पष्ट केले. लोकसभा बहिष्काराचा निर्णय 100 जणांच्या सभेत घेण्यात आला होता, तरी तुम्ही घुमजाव केल्याने आमची फजिती झाली, असे सांगून वेळीप यांनी मडकईकर यांना धारेवर धरले.

आपण भाजपात असलो तरी एसटी समाजाने एकजुटीने घेतलेल्या निर्णयांना आपण बांधील राहणार असल्याची स्पष्टोक्ती धाकू मडकईकर यांनी दिली. गुरुवारी मडगावच्या लोहिया मैदानावर होणाऱ्या 12 एसटी संघटनांच्या प्रतिनिधींची जाहीर सभा राजकीय आरक्षणाचा प्रश्‍न धसास लावेल व निष्क्रिय ‘उटा’ नेत्यांना जाब विचारेल, अशी माहिती रवींद्र वेळीप यांनी दिली.

‘उटा’ आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारण्यात आले व ती संघटना भाजपातील नेत्यांनी अपहृत केली, असे सांगून या नेत्यांनी नाव न घेता प्रकाश वेळीप यांच्यावर टीका केली. संघटनेत नवे नेतृत्व तयार होऊ नये, यासाठीच ही संघटना निष्प्रभ बनविण्यात आली आहे, असे गोविंद शिरोडकर म्हणाले.

भाजप ‘उटा’ आंदोलनातील मागण्यांविषयी गंभीर आहे, या पक्षावर आपला विश्‍वास आहे, असे धाकू मडकईकर म्हणाले.

आज मी भाजपा संघटनेत असलो तरी वेळ येईल तेव्हा मी एसटी संघटनेशी बांधील राहीन व लढ्यात संपूर्णपणे सहभागी होईन. संघटनेने आणखी एक मोठा मेळावा घेऊन दबाव निर्माण करावा.

- धाकू मडकईकर, एसटी उपाध्यक्ष, भाजप

‘उटा’ची एकही मागणी मान्य झालेली नाही, सरकारी नोकऱ्यांमध्ये तीन हजारांपेक्षा अधिक बॅकलॉग आहे. शिवाय राज्य अर्थसंकल्पात 20 टक्के निधी आमच्यासाठी राखीव ठेवायला हवा.

- गोविंद शिरोडकर, गाकुवेध प्रवक्ता

गुरुवारी लोहिया मैदानावर होणाऱ्या एसटी समाजाच्या सर्वसमावेशक बैठकीत आमच्या राजकीय मागण्यांच्या लढ्याची पुनर्आखणी केली जाईल, लढा तीव्र होईल.

- रवींद्र वेळीप, पॉलिटिकल मिशन, ॲटर्नी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Goa Bench: निवृत्त कर्मचारी सेवा नियमांत बदल; निवृत्तीवेतनाची थकबाकी देण्यास एक वर्षाची मुदत

SCROLL FOR NEXT