CM Sawant on Goa Job Scam Dainik Gomantak
गोवा

Goa News: इंधनवाहू वाहिनीला कुठून गळती लागली, हे शोधण्यात यश; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa News: कंपनीने दावा फेटाळला : पण मुख्यमंत्री म्हणतात गळती शोधण्यात यश; प्रश्‍न सुटेपर्यंत परराज्यांतून पुरवठा

दैनिक गोमन्तक

Goa News: वास्कोतील इंधनसदृश पदार्थ गळती प्रकरणात लपवाछपवी सुरू असल्याचे उघड होऊ लागले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इंधनवाहू वाहिनीला कुठून गळती लागली, हे शोधण्यात यश आले, असे सांगितल्याच्या काही तासांतच इंधन उतरवून घेणाऱ्या ‘झुआरी आयएव्ही’ कंपनीने तो दावा नाकारला.

कंपनीने गळती शोधण्यास किती दिवस लागतील हे सांगता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यात कोणत्या प्रकारच्या इंधनाचे अंश सापडले आहेत, हे 12 दिवसांनंतरही स्पष्ट झालेले नाही.

त्यामुळे या प्रकरणात काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची स्थानिकांची भावना झाली आहे. या वाहिनीचा वापर थांबवण्यात आल्याने सध्या बेळगाव, देसूर आणि मिरज येथून पेट्रोल व डिझेल रस्तामार्गे आणण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटनाच्या ऐन हंगामात इंधनाची मागणी वाढली तर राज्याला इंधनाचा तुटवडा जाणवू शकतो.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की वास्कोतील इंधनवाहू वाहिनी जुनी झाल्याने तिला गळती लागल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यामुळे १४ किलोमीटर लांबीची ही पूर्ण वाहिनीच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम महिनाभर चालेल. ते म्हणाले, आता गळती कुठून झाली ती जागा निश्चित करण्यात यश आले आहे. ती गळती बंद केली जाईल.

मुख्यमंत्र्यांचा दावा कंपनीने फेटाळला

  • ‘झुआरी आयएव्ही’ कंपनीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की इंधनवाहू वाहिनीला कुठे गळती लागली ती जागा अद्याप सापडलेली नाही.

  • १० दिवसांत केवळ दीड किलोमीटर टापूचीच खोदाई करणे शक्य झाले आहे.

  • १४ किलोमीटरचा टापू खोदण्यासाठी किती दिवस लागतील, हे सांगता येत नाही.

  • या वाहिनीतून गळती कुठून झाली, हे शोधण्यासाठी श्वानपथक मागवले होते.

    मात्र, ते पथक कुचकामी ठरले. त्यांना इंधन गळती शोधण्यात यश आलेले नाही.

  • दिल्लीतील एका कंपनीकडून अशी गळती शोधणारे उपकरण मागवले होते.

  • त्या कंपनीने शोध घेऊनही गळती झालेली जागा निश्चित करता आलेली नाही.

  • त्यामुळे ती जागा कधी सापडेल हे सांगता येत नाही.

  • त्याला विलंबही लागू शकतो किंवा ती उद्याही सापडू शकते.

वाहिनी फुटल्याच्या घटनेला उजाळा

मांगूरहून हार्बरकडे परस्पर जाण्यासाठी बांधलेल्या रस्त्याच्या कामावेळीही इंधनवाहू वाहिनी काही वर्षांपूर्वी फुटली होती. त्यावेळी वाहिनी कुठे फुटली हे समजूनही ती दुरुस्त करण्यासाठी दोन महिने लागले होते. तोवर राज्याबाहेरून इंधन आणावे लागत होते, अशी आठवण यानिमित्ताने वास्कोतील जनतेकडून सांगितली जात आहे.

इंधन चोरीचा संशय

यापूर्वी मुरगाव बंदर परिसरात इंधनवाहू वाहिनीला आणखी एक वाहिनी जोडली होती. त्यातून टॅंकर भरून ते परस्पर विकले जात होते, असेही सांगण्यात येत आहे. जहाजातून १२-१४ लाख लीटर इंधन आणल्यावर ते पूर्णतः टाकीत पोचते की नाही, हे कंपनीला इतक्या दिवसांत कसे समजले नाही, असा प्रश्न वास्कोत चर्चिला जात आहे. इंधनाचा दाब मोजणारी यंत्रणा ठरावीक अंतरावर का बसवली नाही, अशी विचारणा करण्यात येत आहे.

दोषींवर कारवाई करु

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात इंधनाचा तुटवडा जाणवू नये, याची काळजी घेण्यासाठी सरकारी यंत्रणा स्थितीवर लक्ष ठेवून आहे. इंधन गळतीची कारणे कोणती आणि त्याला कोण जबाबदार, याची चौकशी जिल्हाधिकारी करत आहेत. चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT