World Oceans Day Dainik Gomantak
गोवा

World Oceans Day: समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण रोखणे अत्यावश्यक

प्रदीप सरमोकादम : राज्यभर विविध उपक्रमांनी ‘जागतिक महासागर दिन’ साजरा

गोमन्तक डिजिटल टीम

Plastic Pollution पृथ्वीचे अभिन्न अंग असलेले महासागर मानवी अस्तित्वासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचे असून त्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यात प्लास्टिक प्रदूषण गंभीर असल्याचे मत राज्य जैवविविधता मंडळाचे सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी व्यक्त केले आहे.

विविध उपक्रमाने गुरुवारी (ता.८) जागतिक महासागर दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पणजीत विश्व प्रकृती निधी संस्थेच्या वतीने डॉ. सरमोकादम यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यातील पर्यावरणातील प्लास्टिक प्रदूषण यावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ते बोलत होते. यात अभिनव आपटे, क्लिंटन वाझ, संजीव खंडेलवाल यांनी आपली मते मांडली. ओशन सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव डॉ. मणी मुरली यांनी उपस्थितांना संबोधित करताना सर्व मान्यवर समुद्रशास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या.

डॉ. सरमोकादम म्हणाले, प्लास्टिक प्रदूषण ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. यामुळे निसर्गाची अपरिमित हानी होत असून त्याचा मानवी जीवनावरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. हे वेळीच रोखणे गरजेचे आहे. यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज असून शक्य तितका प्लास्टिकचा वापर टाळायला हवा.

एनआयओकडून किनारी स्वच्छता: जागतिक महासागर दिनानिमित्त राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने गुरुवारी (ता.८) करंजोळ किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. आपले महासागर आणि किनारपट्टी भागाचे संरक्षण आणि जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT